शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आता पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'अर्जुन उस्तरा' असून दिग्दर्शक विशाल भारद्वाज एक अनोखा आणि दमदार अ‍ॅक्शन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत.  

Intern | Updated: Dec 8, 2024, 04:01 PM IST
शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात title=

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास  
तृप्ती डिमरीने गेल्या काही वर्षांत अनेक दमदार भूमिका साकारून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिच्या पहिल्या चित्रपट 'लैला मजनू' मधील अभिनयाने तिच्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली. त्यानंतर आलेल्या 'बुलबुल' आणि 'कला' सारख्या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी तिला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवून दिले. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने. या चित्रपटातील तिच्या 'झोया' या भूमिकेमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेढले ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाऊ लागली. आता तृप्ती आपल्या चाहत्यांच्या भेटीला एका नव्या अंदाजात येणार आहे.  

'अर्जुन उस्तरा'मधील नवी जोडी
'अर्जुन उस्तरा' या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन सुरू झाले असून 6 जानेवारी 2025 पासून चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटासाठी विशेषतः एक भव्य स्टुडिओ तयार करण्यात येणार आहे. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा तयार केली आहे, जी स्वातंत्र्यानंतरच्या अंडरवर्ल्डच्या कथानकावर आधारित आहे.  

विशाल भारद्वाजचा मोठा प्रोजेक्ट
विशाल भारद्वाज हे नेहमीच त्यांच्या दमदार कथांसाठी ओळखले जातात. 'अर्जुन उस्तरा' हा त्यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जात आहे. हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. निर्माते हा चित्रपट वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष देत आहेत.  

शाहीद आणि तृप्तीची केमिस्ट्री कशी असेल?
शाहीद कपूर आणि तृप्ती डिमरीची जोडी कशी दिसेल, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. शाहिद कपूरने याआधी अ‍ॅक्शन आणि रोमान्समध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. तर तृप्तीची प्रेक्षकांशी असलेली नाळ तिच्या प्रत्येक भूमिकेतून दिसून आली आहे. या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच ट्रीट ठरणार आहे.  

हे ही वाचा : https://zeenews.india.com/marathi/photos/aishwaryaabhishek-divorce-rumor...

चित्रपटाची वाट पाहणाऱ्यांसाठी उत्सुकता
अद्याप या चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी चित्रपटसृष्टीत या प्रोजेक्टबाबत चर्चा जोरात सुरू आहे. तृप्ती डिमरी आणि शाहिद कपूर यांची जोडी बॉक्स ऑफिसवर नवी धमाल उडवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रेक्षकांसाठी एक नवा अनुभव घेऊन येणारा 'अर्जुन उस्तरा' हा चित्रपट निश्चितच 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असेल.