मुंबई : 'बिग बॉस सिझन ११'ची विजेती ठरलेली शिल्पा आणि विकास गुप्ता यांच्यातला गोड वाद प्रेक्षकांना चांगलाच भावला.
आता याच कार्यक्रमात विकासला दिलेला आपला शब्द पूर्ण करणार असल्याचं शिल्पानं म्हटलंय.
'भाभी जी घर पर हैं'मध्ये अंगूरी भाभी शिल्पा शिंदे दोन वर्षांपूर्वी या कार्यक्रमातून बाहेर पडली होती. हे सर्व विकासमुळे झाल्याची शिल्पाला वाटत होतं. त्यामुळेच तिनं विकासला त्रास देण्याची एक संधी सोडली नाही. परंतु, कार्यक्रमादरम्यान एका टास्कमध्ये दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्री झाली. यावेळी शिल्पानं विकाससोबत पुन्हा काम करण्याचा शब्दही दिला... हाच शब्द शिल्पा आता पूर्ण करणार आहे.
'झूम'नं दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शिंदे पुन्हा एकदा विकाससोबत काम करणार आहे. परंतु, कोणत्याही टीव्ही सीरियलसाठी नाही तर एक - दोन दिवसांसाठी हे काम करणार असल्याचं शिल्पानं स्पष्ट केलंय. विकासनं शिल्पाला वेब सीरिजमध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला होता... आणि शिल्पानं त्याला होकारही दिला होता... आणि हाच शब्द पाळत आता शिल्पा वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.