Priyanka Chopra धावली देशाच्या मदतीसाठी ; इतर देशांकडून इतक्या रूपयांचा निधी केला गोळा

देशात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. 

Updated: May 14, 2021, 04:08 PM IST
Priyanka Chopra धावली देशाच्या मदतीसाठी ; इतर देशांकडून इतक्या रूपयांचा निधी केला गोळा title=

 मुंबई : देशात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे. या महामारीच्या परिस्थितीत सर्वचं सेलिब्रिटींनी मदतीसाठी एक हात  पुढे केला आहे. अशात अभिनेत्री प्रियंका चोप्रा देखील भारत देशाच्या मदतीसाठी धावून आली आहे. प्रियंका चोप्राने मदतीचं आवाहन केल्यानंतर 14 हजारांपेक्षा जास्त लोकांनी 10 लाख डॉलर जमा करण्यात मदत केली आहे. प्रियंकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे. प्रियंकाच्या या पुढाकारानंतर देशाला मदत होणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra)

प्रियंका इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने जगाचा नकाशा आणि ज्या देशांनी भारताला मदत केली आहे. ते देश दाखवले आहेत. व्हिडिओ पोस्ट करत प्रियंका म्हणाली, 'आपल्या इतिहासात सर्वात काळ्या दिवसांत , माणुसकीने साध्य केलं आहे, की एकजुटीने सर्व काही शक्य आहे. तुम्ही केलेल्या मदतीमुळे मी आणि निक आनंदी आहोत.'

पुढे प्रियंका म्हणते, '14 हजार पेक्षाजास्त नागरिकांनी या कठीण काळात 10 लाख डॉलर जमा करण्यासाठी मदत केली आहे. मिळालेली सर्व मदत ऑक्सीजन कंसंट्रेटर, वॅक्सीन आणि अन्य गरजेच्या वस्तूंसाठी वापरण्यात येत आहेत.' शिवाय या माहमारीवर मात करण्यासाठी 30 लाख डॉलर जमा करण्यासाठी प्रियंका आणि निक प्रयत्न करत आहेत.