सलमानच्या 'भारत' सिनेमातून प्रियांकाला डच्चू

 प्रियांकाला यातून डच्चू दिल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित सिनेमामध्ये कोणती स्टारकास्ट असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

Updated: Apr 2, 2018, 10:13 PM IST
सलमानच्या 'भारत' सिनेमातून प्रियांकाला डच्चू  title=

मुंबई : सलमान खानच्या आगामी सिनेमा 'भारत' ची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. कोरियन सुपरहिट सिनेमाचा हिंदी रिमेक असणाऱ्या या सिनेमात सलमान खान मुख्य भुमिकेत दिसणार आहे. सलमानसोबत या सिनेमामध्ये देसी  गर्ल प्रियांका चोप्राही दिसणार होती. पण प्रियांकाला यातून डच्चू दिल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित सिनेमामध्ये कोणती स्टारकास्ट असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

प्रियांकाच्या जागी कोण ? 

 दरम्यान प्रियांका सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. प्रियांकाऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीची याजागी वर्णी लागणार आहे.  आता प्रियांकाच्याऐवजी दुसरी कोणती अभिनेत्री दिसणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. सलमानऐवजी कॅटरिना कैफची वर्णी लागल्याचे म्हटले जात आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.