'बागी २'च्या यशानंतर भावूक झाला टायगर श्रॉफ, शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बागी २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर आणि यशानंतर अभिनेता टायगरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Sunil Desale Updated: Apr 2, 2018, 07:48 PM IST
'बागी २'च्या यशानंतर भावूक झाला टायगर श्रॉफ, शेअर केला व्हिडिओ title=
File Photo

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बागी २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर आणि यशानंतर अभिनेता टायगरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

'बागी २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. या सिनेमाने केलेली कमाई ही यंदाच्या वर्षातील सर्वात चांगली ओपनिंग ठरली आहे. यासंदर्भात सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट केलं आहे.

इतकी केली कमाई

'बागी २' सिनेमाने पहिल्या दिवशी २५.१० कोटींची कमाई केली त्यानंतर हा आकडा वाढतच आहे. शनिवारी या सिनेमाने २०.४० कोटींची कमाई केली तर, रविवारी २७.६० कोटींची कमाई केली. एकूणच या सिनेमाने ७३.६० कोटींचा गल्ला जमवला आहे. या यशानंतर टायगर श्रॉफने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

व्हिडिओत काय म्हटलयं?

व्हिडिओत टायगरने म्हटलं, "नमस्कार, मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. मला आणि बागी २ सिनेमाच्या टीमला तुम्ही दिलेलं प्रेम आणि समर्थनामुळे तुमचा आभारी आहे. तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. मला असं वाटतं आहे की मी स्वप्न पाहत आहे.

"मला नेमका किती आनंद होत आहे हे तुम्हाला मी शब्दांत सागू शकत नाही. तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद" असेही टायगर श्रॉफने म्हटलं आहे.

'बागी २' हा सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट 'बागी' सिनेमाचा सिक्वल आहे आणि या सिनेमात टायगर श्रॉफ एका नव्या लूकमध्ये पहायला मिळत आहे.