प्रियांकाच्या Birthday Celebration चा 'हा' व्हिडीओ आला समोर, पाहा Video

प्रियांकानं नुकताच तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला आहे. 

Updated: Aug 6, 2022, 07:37 PM IST
प्रियांकाच्या Birthday Celebration चा 'हा' व्हिडीओ आला समोर, पाहा Video  title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं आहे. प्रियांकानं नुकताच तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला आहे. हा खास दिवस प्रियाकानं तिचं कुटुंब आणि मुलीसोबत साजरा केला. त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, आता तिच्या या पार्टीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

हा व्हायरल झालेला व्हिडिओ प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यापासून ते पती निक जोनससोबत किस करण्यापर्यंतचे सगळे क्षण दिसत आहेत. यावेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी देखील खूप एन्जॉय केलं आहे. त्या जावई निकडान्स करताना दिसत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला ते सगळे डिनर टेबलवर असून प्रियांकानं पर्पल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. आधी प्रियांका कॅमेऱ्यात पोज देताना दिसते त्यानंतर निक तिला किस करताना दिसतो. दुसऱ्या व्हिडीओत ते सगळे पूल पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडिओमध्ये निक त्याची सासू मधुसोबत डान्स करताना दिसतो. प्रियांकाच्या वाढदिवसानिमित्त निकनं आकाशात फटाक्यांची आतिषबाजी देखल केलेली दिसत आहे. दोघेही या खास क्षणाकडे टक लावून बघताना दिसले. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षी जानेवारीत आई-वडील झाले आहेत. त्यांच्या मुलीचा जन्म सरोगसीद्वारे झाला, तिचे नाव मालती मेरी चोप्रा जोनस आहे. 

मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा हा पहिला वाढदिवस होता. मालती एक वर्षाची झाल्यावर तिचा चेहरा ते दाखवणार आहेत. यासोबतच मधू यांनी असेही सांगितले की, त्यांची मुलगी आणि जावई मिळून त्यांच्या नातीची काळजी घेत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर प्रियांका चोप्रा लवकरच आपल्या मुलीसोबत भारतात येणार आहे.