प्रियंका चोप्राने शेअर केले 10 Unseen Photos; निक आणि मालतीसोबतचे पाहा खास क्षण

Priyanka Chopra Instagram Pics : प्रियंका चोप्रा जोनसने नवीन वर्ष 2024 च्या शुभेच्छा देत निक आणि मालतीसोबतचे खास क्षण शेअर केले आहेत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 7, 2024, 09:43 AM IST
प्रियंका चोप्राने शेअर केले 10 Unseen Photos; निक आणि मालतीसोबतचे पाहा खास क्षण title=

प्रियांका चोप्रा जोनास पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. देसी गर्लने 2024 च्या एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे 2023 ची झलक शेअर केली आहे. जी खूप सुंदर आहे. अभिनेत्रीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. जो पाहिल्यानंतर चाहत्यांनाही सुखद आनंद झाला आहे. तर मालतीला मेरीच्या गोंडसपणाची झलक पुन्हा एकदा दिसली आहे. प्रियंका तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रियंका चोप्राने काही तासांपूर्वी 10 फोटो आणि व्हिडिओंसह एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिले होते, 2023 मधील खास क्षण... ज्यामध्ये माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 2024 मध्ये शांतता, आराम, कुटुंब, प्रेम, आनंद यांचे हायलाइट फोटो शेअर केले आहेत. आपल्या प्रियजनांना जवळ ठेवा. जर आपण असे करू शकलो तर आपण खूप भाग्यवान आहोत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

पहिल्या फोटोत निक जोनस दिसत आहेत तर पुढे मालती मेरी आणि प्रियंका चोप्राचे खास क्षण देखील दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत प्रियंकाची मुलगी समुद्राच्या लाटा बघताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोत तर प्रियंका आणि मालतीचा अतिशय खास क्षण सेल्फीमध्ये क्लिक केलं आहे. चौथ्या फोटोत जोनस कपल पोझ देताना दिसत आहे. पाचव्या फोटोत समुद्र किनाऱ्यावर जोनस फॅमिली एन्जॉय करताना दिसत आहे. तर सहाव्या फोटोत देसी गर्ल उन्हाचा आनंद घेताना दिसत आहे. हे सगळे फोटो पहिल्यांदाच प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

या पोस्टवर सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री बिपाशा बसूने हार्ट इमोजी शेअर केला आहे. तर एका युझरने लिहिले आहे की, खूप मोहक. आणखी एका युझरने लिहिले, शेवटचा व्हिडिओ सर्वात सुंदर आहे. तिसऱ्या युझरने लिहिले की, मालती शेवटच्या स्लाइडमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.