Saira Bano : स्क्रिन गाजवणाऱ्या किंवा बेफिकीर स्टाईलने तुमची मन कोणी जिंकले असेल तर ते म्हणजे सायरा बानो यांनी. सायरा बानो यांचं नाव सगळ्यात आधी झुंबावर यायचं. या त्या अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या निरागस आणि खट्याळ स्वभावानं सगळ्यांची मने जिंकली. त्यांनी जितकं त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकली तितकी त्यांच्या लव्ह स्टोरीनं प्रेक्षकांची मने जिंकली. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी 1966 मध्ये लग्न केलं. त्यांनच्या लग्नाचा वेळी सायरा बानो 22 वर्षांच्या आणि दिलीप कुमार हे 44 वर्षांचे होते. दिलीप कुमार कोणाशी लग्न करणार हे जाणून घेण्यात सर्वांनाच उत्सुकता होती, पण कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र असलेल्या दिलीप कुमार यांनी वयाच्या 44 व्या वर्षी लग्न केले.
एका मुलाखतीत सायरा बानो यांनी दिलप कुमार यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते. 'मला शाळेत असताना मिसेस दिलीप कुमार बनायचे होते. जेव्हा मी लहानपणी लंडनमध्ये शिकत होते तेव्हापासून एक दिवस मी मिसेस दिलीप कुमार होईन असं माझं स्वप्न होतं. मी भारतात आले तेव्हा मला कळलं की दिलीप साहेबांना सितारची खूप आवड आहे, म्हणून मीही सितार शिकायला लागले. दिलीप साहेब उर्दू भाषेचे जाणकार असल्याने मीही उर्दू शिकू लागले'.
मात्र, सायरा बानो या अभिनेत्री झाल्यानंतरही दिलीप साहेब त्यावेळी सायरासोबत काम करायला तयार नव्हते, कारण त्यांना वाटत होते की ते सायरापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. सायरा त्यांच्यासमोर खूप लहान दिसतील असं त्यांना वाटायचे. दिलीप कुमार यांचे सायरा यांचा कुटुंबियांशी जवळचे नाते असलयाचे ते म्हणायचे की 'मी या चिमुरडीला मोठी झालेली पाहिली आहे, मग तिच्यासोबत हिरोचे काम कसे करणार. ' 'राम और श्याम' या चित्रपटासाठी सायरा यांना त्यांचा अभिनेत्याच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती, पण या द्विधा मन:स्थितीमुळे दिलीपसाहेबांनी ती भूमिकाही नाकारली
हेही वाचा : Animal मधील अभिनेत्यानं वाचवला आत्महत्या करणाऱ्या मुलीचा जीव
23 ऑगस्ट 1966 चा दिवस होता, शिवाय सायरा बानो यांचा 22 वा वाढदिवस असल्याने त्यांच्या आईनेही नव्या घरात हाऊस वॉर्मिंग पार्टी आयोजित केली होती. फिल्मिस्तान स्टुडिओत शूटिंग करून घरी आल्यानंतर त्यांना दिसले की समोरून दिलीपसाहेब स्वतः आले आहेत. वयाच्या 12व्या वर्षापासून सायरा बानो यांची जी इच्छा होती ती अखेर पूर्ण झाली आणि दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी 1966 मध्ये लग्न केले. त्यांच्या वयातील फरकाने चिंता निर्माण केली असली तरी, ते एकमेकांसाठी एकनिष्ठ राहिले. एकेकाळी स्वत: एक प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या सायरा बानो यांनी अखेरीस गृहिणी होण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटसृष्टी सोडली.