मुंबई : बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सिनेनिर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवतेय. सध्या तिच्याकडे बॉलीवूडमधील सिनेमा नसला तरी आपल्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे ती अनेक सिनेमांची निर्मिती करतेय. या व्यस्त वेळापत्रकाचा मात्र तिच्या झोपेवर मोठा परिणाम झालाय.
ट्विटरवरुन तिने ही समस्या आपल्या चाहत्यांशी शेअर केलीये. मला झोप येत नाही आणि डोक्यात सतत विचार सुरु असतात. मी हैराण झालेय की हे कशामुळे घडतंय. जेटलॅगमुळे की अधिक थकव्यामुळे असं होतंय हे कळत नाहीये, असं प्रियंकाने ट्विटरवर म्हटलंय.
भारतासह परदेशातही प्रियंका अनेक प्रोजेक्टसवर काम करतेय. ती रिबेल विल्सन, लियाम हॅमवर्थ, अॅडम डिवाईन यांच्यासह इज नॉट इट रोमँटिक? आणि अ किड लाईक जेक सारख्या प्रोजेक्टवर काम करतेय.
So when sleep evades me and thoughts engulf my mind. I wonder is it jet lag or just memories on overdrive.hmm #latenightmusings pic.twitter.com/dmxXkOJ0Aq
— PRIYANKA (@priyankachopra) August 19, 2017