लग्नाला का नाही बोलवलं? फॅनच्या या प्रश्नावर Priyanka ने दिलं अचूक उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बर्‍याचदा चर्चेत राहते. सध्या ती एका फॅनमुळे चर्चेत आली आहे.

Updated: Mar 27, 2021, 05:18 PM IST
लग्नाला का नाही बोलवलं? फॅनच्या या प्रश्नावर  Priyanka ने दिलं अचूक उत्तर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बर्‍याचदा चर्चेत राहते. आता एका चाहत्याने प्रियंका चोप्राला विचारले आहे की, त्याला लग्नाचे आमंत्रण का दिले नाही? यावर प्रियंका चोप्राने मजेशीर उत्तर दिलं.

प्रियंकाने फॅननं विचारलेल्या या प्रश्नाला अचूक उत्तर दिलं. तिने म्हटलं की, 'मला माफ करा संतोष पटनायक, मला वाटते, मी तुम्हाला ओळखत नाही. यामुळे मी तुम्हाला आमंत्रित करू शकले नाही'. तिने या सोबत हसण्याच्या इमोजी देखील शेअर केला.

प्रियंका चोप्रा ही बॉलिवूडची एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आता हॉलीवूडमध्येही पाऊल ठेवले आहे. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरही ती तिच्या चाहत्यांशी बोलत असते. ती आता स्क्रीनवर कधी दिसणार आहे या प्रश्नाला ही तिने उत्तर दिलं की, 'पुढील वर्षी'

प्रियांका चोप्रा सध्या रुसो ब्रदर्सच्या डिटेक्टिव्ह सीरिज सीताडेलमध्ये काम करत आहे. तिच्या व्यतिरिक्त रिचर्डचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. प्रियंका चोप्राने टेक्स्ट फॉर यू या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. प्रियंता चोप्राने राजस्थानच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये अमेरिकन गायक निक जोनस सोबत विवाह केला होता. दोघेही सध्या आनंदी जीवन जगत आहेत. ते अनेक वेळा एकत्र फोटो देखील शेअर करत असतात. त्यांचे फोटो सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत असतात.