Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपूरेला बायकोची तंबी, ''तिथे'' पाय ठेवला तर तू दूर आणि मी दूर

पुढील काळात राजकरणात जाण्याचा काही विचार आहे का ? असा प्रश्न भारत गणेशपुरे यांना विचारला गेला, त्यावर तो म्हणाला.....

Updated: Mar 27, 2021, 04:34 PM IST
Chala Hawa Yeu Dya | भारत गणेशपूरेला बायकोची तंबी, ''तिथे'' पाय ठेवला तर तू दूर आणि मी दूर title=

मुंबई :  अनेक आमदारांसोबत सौख्य आहे, नेत्यांशी ओळख आहे, तर पुढील काळात राजकरणात जाण्याचा काही विचार आहे का ? असा प्रश्न भारत गणेशपुरे यांना विचारला गेला, त्यावर तो म्हणाला, "बघुयात...मागच्या वेळेस ऑफर आल्या आहेत, पण मला वाटत नाही ती माझी फिल्ड नाही.  माझ्या बायकोने ही बजावले आहे की, जर राजकरणात गेलास तर तु दूर आणि मी दूर." असे उत्तर भारतने दिले.( भारत गणेशपूरे नेमकं काय म्हणाला व्हीडिओ पाहा बातमीच्या खाली)

त्यावर सागर कारंडेला विचारले असता त्याचे असे म्हणने आहे की, "भारत हा मराठीतला परेश रावल आहे. त्याला ताटात काही दिले की तो आपलं स्वत: चं मीठ मसाला लावून आणि अगदी मनापासून करतो, त्यामुळे अभिनय क्षेत्रासाठीच तो बनला आहे आणि त्याने राजकारणान न जावे असे मला वाटते."

चला हवा येऊ द्या या झी मराठीवरील मालिकेने अवघ्या मराठी माणसांची मनं जिंकली आहेत, त्यांना मनापासून हसायला लावलं आहे. असं म्हणू या की हसवून हसवून त्यांनी अनेकांचे चांगले चांगले आजार पळवून लावले असतील. अशा माणसांनी ज्यांना महाराष्ट्राला भरभरुन हसवलं, डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसवलं अशा सर्व कलाकारांशी बातचित केली आहे, झी २४ तासचे संपादक निलेश खरे यांनी. कलाकारांनी त्यांच्या आयुष्यातील काही भन्नाट किस्से सांगितले आहेत.