Priyanka - Nick च्या जीवनातील कधीही न विसरता येणारी आठवण, पाहा Video

Priyanka नेही निकच्या वाढदिवसासाठी खास Surprise प्लन केलं. 

Updated: Sep 19, 2022, 04:21 PM IST
Priyanka - Nick च्या जीवनातील कधीही न विसरता येणारी आठवण, पाहा Video title=
priyanka chopra celebrated nick jonas birthday on golf nm

Priyanka Chopra : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) हिने बॉलिवूडपाठोपाठ (Bollywood) हॉलिवूडमध्ये (Hollywood) आपलं नाव कमावलं आहे. आता ती पती निक जोनस (Nick Jonas) आणि मुलगी मालती मेरीसह (Malti Marie) अमेरिकेत (america) राहतंय. प्रियंका सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रीय असते. आयुष्यातील अनेक क्षणांचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियंकाने एका खास शैलीत निकचा 30 व्या वाढदिवस (birthday) साजरा केला. 

नवऱ्याचा (husband) वाढदिवस हा प्रत्येक बायकोसाठी (wife) खूप खास दिवस असतो. मग नवऱ्याचा हा खास दिवस अजून कायम स्मरणात राहावा म्हणून बायको Surprise ची तयारी करतात. प्रियंकानेही निकच्या वाढदिवसासाठी खास Surprise प्लन केलं. 

काय होतं प्रियंकाचं Surprise?

प्रियंकाने खास गोल्फ (Golf) मैदानात निकचा वाढदिवस साजरा केला. अमेरिकेतील अॅरिझोनामध्ये (Arizona) वाढदिवसाच्या दिवशी जोरदार गोल्फ खेळला आणि पार्टी केली. या पार्टीचा व्हिडीओ शेअर करताना प्रियंकाने निकसाठी खास विश नोटही लिहिली आहे. (priyanka chopra celebrated nick jonas birthday on golf nm)

या पार्टीला निकचे आई-वडील, त्याचे नातेवाईक आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. त्याला गोल्फ हा खेळ आवडतो म्हणून प्रियंकाने पार्टीची थीम गोल्फ खेळाशी निगडीत ठेवली होती. सर्वांनी पांढऱ्या रंगाचे गोल्क पोशाख घातला होता. केक आणि इतर खाद्यपदार्थ देखील थीमला शोभतील असे होते. 

'माझ्या प्रिय...'

प्रियंकाने इंस्टाग्राम अकाउंटवर वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक दाखवली आहे. ती लिहिते, ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माय लव्ह. तु्झ्या आयुष्यात सदैव आनंद आणि चेहऱ्यावर हसू राहावं. आय लव्ह यू''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)