Priyanka Chopra ला ब्रालेस टॉप परिधान करणं पडलं महागात, Oops Moment पासून वाचण्यासाठी करत होती 'हे' काम

Priyanka Chopra चा हा मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून तिला बऱ्याच लोकांनी तिच्या लूकवरून ट्रोल केले होते. 

Updated: Dec 19, 2022, 02:56 PM IST
Priyanka Chopra ला ब्रालेस टॉप परिधान करणं पडलं महागात, Oops Moment पासून वाचण्यासाठी करत होती 'हे' काम title=

Priyanka Chopra Oops Moment : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकाचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. प्रियांका तिच्या हटके स्टाइलसाठी ओळखली जाते. मात्र, अनेकवेळा प्रियांका तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच प्रियांकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत प्रियांका एका मुलाखतीत असून संपूर्णवेळ ती तिचा ड्रेस कसा सांभाळते हे पाहायला मिळत आहे. खरंतर या ड्रेसमुळे प्रियांका Oops Moment ची शिकार होता-होता वाचली. 

हा व्हिडिओ एप्रिल 2021 च्या बाफ्टा पुरस्काराचा आहे. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांकानं खूपच बोल्ड ड्रेस परिधान केला होता. बाफ्टामधील प्रियांकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी प्रियांकानं असे काही कपडे परिधान केले की तिला पूर्णवेळ अनकम्फर्टेबल वाटत होते. येथे येणारी प्रत्येक व्यक्ती प्रियांकाकडे पाहत राहिली. तर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलया व्हिडीओमध्ये प्रियांका एका मुलाखतीत असून तिच्या ड्रेसमुळे अनकम्फर्टेबल असल्याचे दिसत आहे. ती पूर्णवेळ तिचं जॅकेट दोन्ही हातांनी सांभाळताना दिसली. (Priyanka Chopra Bold Look)

प्रियांका चोप्राच्या या हटके लूकबद्दल बोलायचे झाले तर तिनं गुलाबी रंगाचं एम्ब्रॉयडरी जॅकेट परिधान केलं आहे. तर पांढऱ्या रंगाची धोती पॅन्ट परिधान केली आहे. पण तिनं परिधान केलेल्या गुलाबी जॅकेटची पुढची बाजू ही संपूर्ण उघडी आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. (Priyanka Chopra Troll) 

हेही वाचा : FIFA Word Cup 2022 : वर्ल्ड कप ट्रॉफी अनावरणाचा Deepika Padukone ला मान, काय आहे यामागचं कारण

प्रियांका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका काही दिवसांपूर्वी भारतात परत आली होती. पण यावेळी ती करोना काळानंतर आली होती.नुकतेच प्रियांकाच्या घरातील जीमचे काही फोटो व्हायरल झाले असून त्यात तिच्या Mary Kom आणि तिचा पती निक जोनसच्या Kingdom चित्रपटाचे पोस्टर आहेत. 

दरम्यान, प्रियांका लवकरच कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्यासोबत फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'(Jee Le Zaraa) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी सुरु होणार आहे. याशिवाय, रुसो ब्रदर्स यांच्या आगामी साय-फाय सिरिज ‘सीटाडेल’मध्ये प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.