प्रियांकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी दाखवणार आपल्या मुलीचा चेहरा

प्रियांकाची आई मधु यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Updated: Aug 3, 2022, 04:36 PM IST
प्रियांकाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी दाखवणार आपल्या मुलीचा चेहरा title=

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियांकानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न केलं. प्रियांका ही एक ग्लोबल स्टार असून सध्या ती आईपण अनुभवते. प्रियांका आणि निक जोनस यांच आयुष्य लेक मालतीच्या जन्मानंतर बदललं आहे. प्रियांकानं अनेकदा लेक मालतीसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. मात्र, तिनं आता पर्यंत कोणत्याच फोटोत मालतीचा चेहरा दाखवला नाही. त्यामुळे मालती नक्की कशी दिसते असा प्रश्न तिच्या चाहत्यांना आहे. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाची आई मधु यांनी प्रियांकानं तिच्या मुलीचा चेहरा दाखवण्याचा निर्णय घेतला असून कधी दाखवणार आहे, याचा खुलासा केला आहे. 

प्रियांका आणि निक जोनस जानेवारी महिन्यात सरोगसीद्वारे आई वडील झाले. जोनस कुटुंबात मालती या चिमुकलीचा जन्म झाला. मदर्स डेच्या निमित्तानं प्रियांकानं लेकीची पहिली झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. तेव्हा तिनं लेकीबाबत एक महत्त्वाचा खुलासा देखील केला.  मालतीचा जन्म झाल्यानंतर ती 100 दिवस आयसीयूमध्ये होती. इतके दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर 100 दिवसांनी मालतीला घरी आणलं. मालतीच्या जन्मानंतर सगळेच खुश आहेत. प्रियांकानं लेकीचं नाव आईच्या नावावरुन ठेवलं आहे. तिच्या आईचं नाव मधुमालती असं आहे. त्यावरुन तिनं लेकीचं नाव मालती असं ठेवलं. मधु यांनी नुकतीच 'इंडियन एक्सप्रेस'ला मुलाखत दिली. तेव्हा प्रियांका आणि निक जोनसचं त्यांच्या लेकीचा चेहरा काही दिवसात सर्वांना दाखवणार आहेत, असं सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रियांका आणि निक यांच्या पालकत्वाबाबत बोलताना मधु म्हणाल्या, 'मी मालतीची मालिश करते. निक तिला आंघोळ घालतो. तिचे डायपर चेंज करतो. दोघेही त्यांच्या लेकीचा चेहरा तिच्या पहिल्या वाढदिवसाला दाखवू शकतात. प्रियांकानं नुकताच तिचा 40 वा वाढदिवस लेक मालतीबरोबर साजरा केला.  निक जोनसचा मित्र परिवार आणि कुटुंबाबरोबर प्रियांकानं तिचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर तिनं पार्टीचे फोटो देखील शेअर केले होते. आता प्रियांकाच्या लेकीचा चेहरा पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांना  2023 ची वाट पाहावी लागणार आहे.

दरम्यान प्रियांका ही लवकरच रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यासोबतच प्रियांका बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका असणार आहेत.