प्रियाने फेसबुकच्या मालकाला टाकले मागे

व्हॅलेन्टाईन डे आधी आपल्या नजरेनं अनेक तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. 

Updated: Feb 21, 2018, 11:08 PM IST
प्रियाने फेसबुकच्या मालकाला टाकले मागे title=

मुंबई : व्हॅलेन्टाईन डे आधी आपल्या नजरेनं अनेक तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. 

मार्क झुकेरबर्गलाही टाकलंय मागं

प्रियाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज सेलिब्रिटींना मागे टाकलंय. आता प्रिया वारियरच्या नावावर नवा विक्रम झालाय. लोकप्रियता आणि फॉलोअर्सच्या बाबतीत तिने फेसबुकचा मालक मार्क झुकेरबर्गलाही मागं टाकलंय. 

किती झाले फॉलोअर्स?

प्रियाच्या फॉलोअर्सची संख्या ही झुकेरबर्गच्या फॉलोअर्सपेक्षा जास्त आहे. मार्क झुकेरबर्गच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्याही चाळीस लाखाच्या आसपास आहे. तर प्रियाच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या ४५ लाखांवर पोहचलीय. दिवसेंदिवस प्रियाच्या लोकप्रियतेत वाढ होत असून फॉलोअर्सची संख्या आणखी वाढणार असंच बोललं जातंय. 

प्रियाला न्यायालयाचा दिलासा

आपल्या नखरेल अदांमुळं चर्चेत असलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आणि दिग्दर्शक ओमर अब्दुल वहाब यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा दिलाय... प्रिया आणि वहाब यांच्या विरोधात कोणताही खटना दाखल करू नये, असे आदेश न्यायालयानं दिलेत. केवळ गाण्याच्या आधारे गुन्हे दाखल करू नका, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. याप्रकरणी महाराष्ट्र सरकार, तेलंगना सरकार आणि याचिकाकर्त्याकडून न्यायालयानं उत्तर मागवलंय...