व्हायरल व्हिडिओतून काही तासांत इंटरनेटवर सुपरस्टार बनलेल्या प्रिया प्रकाशबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

  व्हॅलेंटाइन वीकमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मल्याळम चित्रपट 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) मधील आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरूणी आपल्या नयनांनी सर्वांना घायाळ करत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 12, 2018, 08:54 PM IST
व्हायरल व्हिडिओतून काही तासांत इंटरनेटवर सुपरस्टार बनलेल्या प्रिया प्रकाशबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी title=

नवी दिल्ली :  व्हॅलेंटाइन वीकमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मल्याळम चित्रपट 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) मधील आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी तरूणी आपल्या नयनांनी सर्वांना घायाळ करत आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 

काय नाव आहे तरूणीचं...

एक दिवसांपूर्वी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला अनेकांच्या टाइमलाइनवर दिसत आहे. ही तरूणी कोण असा प्रश्न अनेकांना भेडसावत आहे. तर आम्ही तुम्हांला ही तरूणी कोण याचं उत्तर देणार आहोत. ही तरूणी 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) या चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. आणि तिचे नाव आहे प्रिया प्रकाश वॉरियर आहे. 

पाहा : इंटरनेटवर सर्वात Cutest Video होतोय व्हायरल

एका रात्रीतून झाली सुपरस्टार

प्रियाने आपल्या चित्रपटातील गाण्याची एक छोटी क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर ही क्लिप थोड्याच अवधीत खूप व्हायरल झाली आहे. या गाण्याच्या क्लिपने १८ वर्षीय अभिनेत्रीला देशभरात एक नवीन ओळख मिळवून दिली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार प्रियाचा जन्म त्रिशूर या केरळमधील गावात झाला आहे. एका रात्रीत इंटरनेटची सेन्सेशन बनणारी प्रिया त्रिशूरच्या विमला कॉलेजमध्ये बी-कॉमच्या फर्स्ट इअरमध्ये शिकत आहे. 'उरू अदार लव ( Oru Adaar Love ) या चित्रपटात ती एका विद्यार्थीनीची भूमिका वढवत आहे. 

 

 

Thank you for all the love and support

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

 

Be happy.It drives people crazy

A post shared by priya prakash varrier (@priya.p.varrier) on

४५ लाख जणांनी पाहिले...

'उरू अदार लव ( Oru Adaar Love )चे गाणे यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. आतापर्यंत हे गाणे ४५ लाख जणांनी पाहिले आहे. या गाण्यामुळे प्रियाचे नशीबच बदलले आहे. हा चित्रपट ३ मार्च रोजी रिलीज होणार आहे. पण त्यापूर्वीच प्रिया इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.