Priya Bapat Bridal Look: प्रिया बापट ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. सध्या तिचं आणि उमेश कामत याचं 'जर तरची गोष्ट' हे नाटकं प्रचंड गाजतं आहे. महिन्याभरापुर्वी या नाटकाच्या प्रयोगाला सुरूवात झाली आहे. महिन्याभरातच या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा हाऊसफुल्ल ठरला आहे. तब्बल दहा वर्षांनंतर तरी उमेश आणि प्रिया हे नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांचे 'नवा गडी नवं राज्य' प्रचंड गाजले होते. त्यामुळे त्यांच्या या नाटकाची तेव्हा चांगलीच चर्चा होती. सोबतच प्रिया आणि उमेशची केमेस्ट्रीही तेव्हा फार हीट झाली होती. त्यांनी त्याच दरम्यान लग्नही केले होते. आता पुन्हा एकदा प्रिया उमेशची नाटकातून दिसणारी केमेस्ट्री प्रेक्षक, चाहते एन्जॉय करताना दिसत आहेत. पल्लवी अजय आणि आशुतोष गोखलेही यावेळी प्रमुख भुमिकेतून दिसत आहेत.
परंतु सध्या प्रिया बापटच्या एका पोस्टनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तिनं नवरीमुलीप्रमाणे गेटअप केला आहे. कपाळाला मुंडावळ्या बांधल्या आहेत. सोबतच जरीची साडी, त्यावर शेला, दागिने, केसात फुलं, आंबाडा, खांद्यावर शेला अशा वेशात प्रिया बापटचा लुक पाहून चाहते भारावून गेले आहेत. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चा आहे. यावेळी प्रियाच्या या गेटअपचं नक्की काय कनेक्शन आहे याचीही सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. प्रियाचं तर लग्न झालंय मग आता ही कोणती गुडन्यूज आहे? यावरही चाहत्यांना प्रश्न पडले असावेत. परंतु प्रिया कुठल्या लग्नाची तयारी करत नाहीये तर तिनं एका अॅड फ्लिमसाठी नवऱ्या मुलीचा गेटअप केला आहे.
हेही वाचा : 'राजेश खन्ना, गोविंदा बेशिस्त कलाकार...' मिलिंद गवळीची सूचक पोस्ट चर्चेत
प्रियानं आपले हे फोटो शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''बाकरवडीची AD पाहिलीत का?'' यावेळी तिनं या जाहिरातीसाठी काम केलेल्या सर्वांचेच आभार मानले आहेत. त्याचसोबत ''मज्जा आली'', असंही म्हटलं आहे. निपुण धर्माधिकारीसोबत पहिलंच काम केलं असल्याचेही त्यानं यावेळी सांगितले आहे. त्यामुळे तिची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी ती या फोटोत फारच गोड आणि लाजरी नवरी मुलगी दिसते आहे.
प्रिया बापट मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे सोशल मीडियावरही लाखो फॅन्स आहेत. यावर्षी तिची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही वेबसिरिजही प्रचंड गाजली होती.