Video: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...

Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल 

दिक्षा पाटील | Updated: Sep 3, 2023, 12:41 PM IST
Video: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्... title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan and Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यात आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लवकरच 500 कोटींचा आकडा पार करणार आहे. या सगळ्यात काल 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण तिथे आलेल्या एका अभिनेत्याला पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले आणि तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख... शाहरुखनं देखील सनी देओलच्या 'गदर 2' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. इतकंच नाही तर त्या दोघांना पापाराझींसमोर एकत्र पोज देत फोटो देखील काढले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. 

सोशल मीडियावर 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. पण सगळ्यांचे लक्ष शाहरुखनं वेधले आहे. 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीत शाहरुख आणि सनी एकत्र दिसले. यंदाच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये शाहरुखचा पठाण आणि सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटांती नावं आहेत. तर दुसरीकडे शाहरुख हा त्याच्या जवान या चित्रपटाला घेऊन खूप उत्सुक आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर शाहरुख आणि सनी हे दोघे तब्बल 16 वर्षांनंतर एकत्र दिसत आबेत. डर या चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर ते दोघं आता एकत्र दिसत आहेत. त्यांचा हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की डर के आगे गदर है. यावेळी त्यानं ही कमेंट त्या दोघांच्या डर या चित्रपटाचा संदर्भ देत केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करत बॉलिवूडच्या पठाणनं गदर केलं आहे. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी शाहरुख आणि सनी पुन्हा एकत्र आल्यानं आनंद व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : ...म्हणून तिने संपूर्ण थेअटरच बुक केलं! नागपूरमधील शाहरुखच्या 'जबरा फॅन'चा प्रताप

1993 साली त्या दोघांचा डर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खाननं खलनायकाची भूमिका साकारली होती. तर सनी देओलनं हीरोची. रिपोर्ट्सनुसा, या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानला चांगली लोकप्रियता मिळाली तर सनीला लोकांकडून जास्त प्रेम मिळाले नाही. त्यांचा हा वाद इतका चिघळला की 30 वर्षे ते दोघे एकमेकांशी बोलले नव्हते. आता मात्र, 'गदर 2' च्या प्रदर्शनानंतर त्या दोघांचं फोनवर बोलणं झालं आणि इतकंच नाही तर शाहरुखनं चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत देखील हजेरी लावली होती.