'हंबीरराव मोहिते' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित

हंबीरराव मोहितेंचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर

Updated: Mar 14, 2020, 12:37 PM IST
'हंबीरराव मोहिते' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित  title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती होण्याचा मान हा 'हंबीरराव मोहिते' यांना मिळाला. हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. 'सरसेनापती हंबीरराव' असं या सिनेमाचं नाव असून याचं पोस्टर सोशल मीडियार रिलीज झालं आहे. 

गुरूवारी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. याच मुहूर्तावर ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं. ‘जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा’ अशा शब्दांत सरसेनापती हंबीरराव यांचं या पोस्टरवर वर्णन करण्यात आलं आहे . 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

जणू सह्याद्रीचा कडा , श्वास रोखुनी खडा ...

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde) on

'मुळशी पॅटर्न' या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलं आहे. हंबीरराव मोहितेंची भूमिका कोण साकारणार? याबाबत अजून खुलासा झालेला नाही. पण या पोस्टरवरून प्रवीण तरडेच ही भूमिका साकारणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.

इतिहासात हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास काही तुकड्यांमध्ये अनुभवला आहे. तसेच झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील हंबीर मामा देखील प्रेक्षकांनी अनुभवले. मात्र आता हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळणार आहे.