मुंबई : 'मी त्याला रंगेहात पकडलं शिवाय त्याला दुसरी संधी देखील दिली. करण मी त्याच्या प्रेमात फार आंधळी होती. त्याने केलेल्या विनविणीनंतर मी त्याला माफही केलं.' नुकताच झालेल्या एका मुलाखती दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोणने लग्नाआधीच्या प्रेमाबाबत भाष्य केलं. या सर्व गोष्टींमधून बाहेर येण्यास मला खूप वेळ लागला असं देखील ती यावेळेस म्हणाली.
या मुलाखती दरम्यान कोणाचंही नाव न घेता तिने तिच्या नातेसंबधांविषयी अनेक रहस्यांचा उलगडा केला. 'माझ्यासाठी शारीरिक संबंध म्हणजे केवळ जवळीक नसून त्यात भावना आहेत. मी कधीही कोणापासून काही लपवले नाही किंवा कोणाला फसवले नाही. जर नात्यामध्ये कोणी माझी फसवणूक करत असेल तर मी त्या नात्यात का असावं?'
असा प्रश्न उपस्थित करत तिने सिंगल राहण्यास प्राधान्य दिलं. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांची जोडी अनेकांच्या पसंतीची जोडी आहे. आता दीपवीर त्यांच्या नात्यामध्ये अत्यंत आनंदी आहेत.
लग्नाआधी दोघांचीही नावे अनेकांसोबत जोडली गेली होती. काही वर्षापूर्वी दीपिका आणि अभिनेता रणबीर कपूरच्या नात्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. तर रणबीर आता अभिनेत्रा आलिया भट्टला डेट करत आहे. शिवाय चाहते त्यांच्या लग्नाची प्रतिक्षा देखील करत आहेत.
त्याचप्रमाणे दीपिका लवकरच पती आणि अभिनेता रणवीर सिंगसोबत '८३' एकत्र स्क्रिन शेअर आहे. चित्रपटात रणवीर भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार असून दीपिका त्यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.