मुंबई : “डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज” एक असा कार्यक्रम ज्यामध्ये होता Extra तडका आणि धमाल मनोरंजन. जगातील पहिला वजनदार डान्सिंग शो, १५ वर्ष आणि त्यावरील अश्या मुली आणि महिलां यात सहभागी झाल्या ज्यांच वजन ७० किलो किंवा त्यापेक्षा जास्त होतं. या वजनदार स्पर्धकांचे परीक्षण सोनाली कुलकर्णी आणि RJ मलिष्का यांनी केलं.
टॉप ६ मध्ये रंगलेल्या ह्या फिनाले मध्ये पहिल्या वजनदार पर्वाची विजेती ठरली ती पुण्याची 'प्रणाली चव्हाण'. प्रणाली खरं तर आर्किटेक्ट बनून कॉर्पोरेट कंपनी मध्ये जॉब करत होती पण डान्स चे वेड तिला स्वस्थ बसू देत नव्हते, याच डान्स च्या वेडेपणाने सुरु झालेला तिचा प्रवास आज तिला “डान्सिंग क्वीन साईज लार्ज फुल चार्ज” ची विजेती बनवून गेला.
ह्या पर्वाची 1st Runner Up ठरली अहमदनगरची ‘स्नेहा देशमुख’ स्नेहा टीव्ही क्षेत्रात नवीन नाही या आधी मराठी मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या स्नेहाने काही वजन कमी करणाऱ्या औषधांचं सेवन केलॆ आणि त्याच्या साईड इफेक्टने स्नेहाचं वजन वाढले. मुळात आई भरतनाट्यम शिक्षिका असल्यामुळे डान्स घरातच होता ... आपल्या वाढलेल्या वजनाचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेऊन ती आज डान्सिंग क्वीनची 1st Runner Up ठरली.
ह्या पर्वाची 2nd Runner Up ठरली चेंबूर मुंबईची ‘अपूर्वा उंडाळकर’ आजच्या आधुनिक जीवनशैली चा भाग बनताना लग्ना मध्ये अवास्तव खर्च करण्यापेक्षा करिअर ला जास्त महत्व देणारी, ऐन स्पर्धेत अपूर्वाची आई गेली पण ती डगमगली नाही आईची इच्छा होती तिने झी मराठी वर एकदा तरी झळकावे आणि तीच आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने प्रण केला आणि ती आजपर्यंत सर्वात जास्त ब्लास्ट घेत डान्सिंग क्वीन ची 2nd Runner Up ठरली.