'अमर फोटो स्टुडिओ'त सखी गोखलेऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री!

तरुणाईला नाटकांकडे पुन्हा आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेलं नाटक अमर फोटो स्टुडिओ सध्या रसिकांच्या मनवार राज्य करत आहे.

Updated: Aug 18, 2018, 02:25 PM IST
'अमर फोटो स्टुडिओ'त सखी गोखलेऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री!

मुंबई : तरुणाईला नाटकांकडे पुन्हा आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेलं नाटक अमर फोटो स्टुडिओ सध्या रसिकांच्या मनवार राज्य करत आहे. काही दिवसांपूर्वीच या नाटकातून अभिनेत्री सखी गोखलेने एक्झिट घेतली. उच्च शिक्षणासाठी सखी इंग्लंडला रवाना होणार असल्यामुळे तिने हे नाटक सोडले. पण सखी बाहेर पडल्यावर तिची भूमिका कोण साकारणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लावून राहिले होते. पण आता याचा उलघडा झाला आहे. सखीच्या जागी अभिनेत्री पर्ण पेठे या नाटकात झळकणार आहे.

नुकतीच पर्ण पेठेने ही खुशखबर सोशल मीडियाद्वारे रसिकांना दिली. नाटकाचे पोस्टर शेअर करत पर्णने लिहिले की, प्रत्येक नाटकाचा प्रवास हा अंतरबाह्य बदलवणारा ठरला आहे. हा नवा प्रवास देखील त्याला अपवाद नसेल. एकाच वेळी पोटात गोळा आणणारं, नवीन जबाबदारी देणारं आणि दुसऱ्या बाजुला प्रचंड उत्साह देणारं माझं नवं नाटक- अमर फोटो स्टुडिओ. मला या स्टुडिओत सामावून घेतल्याबद्दल माझ्या सर्व प्रिय मित्र-मैत्रिणींचे मनापासून आभार. 

 

नाटक ही गोष्ट मला अत्यंत प्रिय आहे. माझ्या प्रत्येक नाटकाचा प्रवास हा मला अंतरबाह्य बदलवणारा ठरला आहे. हा नवा प्रवास सुध्दा ह्याला अपवाद नसेल ! एकाचवेळी पोटात गोळा आणणारं, नवीन जबाबदारी देणारं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड उत्साह देणारं माझं नवं नाटक : अमर फोटो स्टुडिअो !! मला ह्या स्टुडिअोत सामावून घेतल्याबद्दल माझ्या प्रिय आणि हरहुन्नरी मित्र मैत्रिणीचे मनापासून आभार  last two days were so intense! already done with 4 shows of ‘Amar Photo Studio’!!! the costumes, the housemusic, the anxiety, the dark sanctity of an auditorium, the energy and the actual travel of space and time..! all my very dear friends run ‘Amar Photo Studio’ ! they have even produced it! the play is a correct balance of so many things! it has always made me wonder how they have managed to conceive, put up and run the play! i have and will always have tremendous respect for them! as you may already know, henceforth i am going to be part of this play! it is challenging and so exciting!! the team has merged me with them so graciously and with such dignity! i am really thankful to them and i hope i live upto the love everyone has showered on Amar Photo Studio!!

A post shared by Parna Pethe (@parnapeace) on

या नाटकातून अमेय वाघ, सुव्रत जोशी, पर्ण पेठे, सिद्धेश पूरकर आणि पूजा ठोंबरे हे तरुण हरहुन्नरी कलाकार रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.