तेच सौंदर्य, तेच ग्लॅमर; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची?

Prajakta Mali Transformation: प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आज आपल्या मोहक सौंदर्यांनं चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिच्या फोटोशूटचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्ता माळी ही इंडस्ट्रीत येण्यापुर्वी कशी दिसत होती? 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 25, 2023, 06:00 PM IST
तेच सौंदर्य, तेच ग्लॅमर; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची? title=
prajakta mali transformation see her old photo goes viral on internet

Prajakta Mali Transformation: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आपल्या हटके लुकनं आणि आपल्या दिलखेचक अभिनयानं सगळ्यांना कायमच घायाळ करताना दिसते. तिच्या सौंदर्यावर कुणी फिदा झालं नाही तरच नवल परंतु प्राजक्ताचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. प्राजक्ताही इंडस्ट्रीत येण्यापुर्वी अत्यंत साधी आणि सिंपल लुकमध्ये दिसत होती. त्यामुळे तेव्हाची प्राजक्ता आणि आत्ताची प्राजक्ता यात जमीन आसमानााचा फरक आहे. परंतु तिचं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तिच्या रूपाचेही अनेकांनी कौतुक केले आहे. आज प्राजक्ता माळी म्हणजे सौंदर्याची खाण आहे. तिच्या हटके स्टाईलिंगचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते. त्यामुळे चाहतेही तिच्या फोटोंवर कमेंट्स करताना दिसतात. तुम्ही प्राजक्ताचे आधीच फोटो पाहिलेत का? 

प्राजक्तानं मराठी मालिकांतून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. तेव्हा ती अनेक लोकप्रिय मराठी मालिकांतून दिसली होती. त्यानंतर आता ती वेबसिरिज, मराठी चित्रपट, नाटक, जाहिराती, टेलिव्हिजन यांसारख्या हरएक माध्यमांवर झळकताना दिसते आहे. सोशल मीडियावरही तिची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते त्यामुळे तिच्या लोकप्रियतेतही फार वाढ झाली आहे. इन्टाग्रामवरही तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. तिचे फोटोशूटही ते शेअर करताना दिसते ज्यात ती अत्यंत ग्लॅमरस दिसते. मध्यंतरी तिचे अनेक जूने फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तिची चर्चा रंगलेली असते. 

काही वर्षांपुर्वी तिनं आपले फारच जूने फोटो व्हायरल झाले होते. ज्यात तिनं आपल्या कॉलेजच्या वेळेस फोटो शेअर केले होते. मध्यंतरी सोशल मीडियावर हे ट्रेण्ड व्हायरल झाला होता ज्यात #meat20 हा हॅशटॅग व्हायरल होऊ लागला होता. म्हणजे आपण जेव्हा 20 वर्षांचे होतो तेव्हा आपण कसे दिसत होता त्याचा फोटो या हॅशटॅगसह ट्रेण्ड करायचा होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी प्राजक्तानं आपले 17 व्या वयातील फोटो शेअर केले होते आणि #meat17 हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता. त्यामुळे तिचे हे 17 व्या वर्षीचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. आता तुम्ही प्राजक्ताचे इन्टाग्रामवरील फोटो पाहिलेत ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्राजक्तानं आपलं ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे जे पाहून तिच्या चाहत्यांनाही आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

\

काही दिवसांपुर्वी प्राजक्ताची 'रानबाजार' हे वेबसिरिज ही व्हायरल झाली होती. त्यामुळे प्राजक्ता फार चर्चेत आली होती. तिच्या बोल्ड सीन्समुळेही ती फार चर्चेत आली होती.