'प्रेमात पडले आणि कळलंच नाही...' प्राजक्ता माळीचा जाहीर खुलासा

Is Prajakta Mali In Love : प्राजक्ता माळीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर खुलासा केला आहे. प्राजक्तानं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून चर्चेचा विषय ठरली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 29, 2023, 03:30 PM IST
'प्रेमात पडले आणि कळलंच नाही...' प्राजक्ता माळीचा जाहीर खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Is Prajakta Mali In Love : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचं देखील नाव येतं. प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संपर्कात राहते. दरम्यान, नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवरून तिच्या आयुष्यात प्रेम आलं की काय असा सवाल अनेकांना पडला आहे. कारण तिनं थोडक्यात 'प्रेमात पडण्या' विषयी ही पोस्ट शेअर केली आहे. नक्की काय आहे संपूर्ण प्रकरण हे जाणून घेऊया...

प्राजक्तानं ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्तानं गुलाबी रंगाचं टॉप परिधान केलं आहे. त्यासोबत प्राजक्ताच्या हातात एक पाटी आहे. त्या पाटीवर लिहिलं आहे की 'रेवा, वय - 25, उंची- 5.1, आरोप- प्रेमात पडणे'. त्यात खाली त्या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'दुनिया गेली तेल लावत...' ही पोस्ट शेअर करत प्राजक्तानं 'मी रेवा! प्रेमात पडले आणि कळलंच नाही की इतकी कशी अडकले. कुणाच्या? इश्श! कळेलच तुम्हाला 29 सप्टेंबरला. #तीनअडकूनसीताराम फक्त चित्रपटगृहात.' असं कॅप्शन देखील प्राजक्तानं दिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरंतर प्राजक्ताची ही पोस्ट तिच्या आगामी चित्रपटासाठी आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचे नाव 'तीन अडकून सीताराम' असे आहे. या चित्रपटाचे विविध पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्राजक्ताच्या या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात तिच्यासोबत वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, गौरी देशपांडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे हृषिकेश जोशी यांनी केले आहे. तर हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हेही वाचा : ... म्हणून सुष्मिता सेनला मिळणार नाही वडिलांच्या संपत्तीतून एकही रुपया

प्राजक्तानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आरोप चुकीचा वाटतोय प्रेमात 'पाडणे' असा हवा होता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'व्हा प्राजू खूप वाट पाहतोय, खूप खूप शुभेच्छा.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तस तर तू आमच्या हृदयात पहिल्यापासूनच जन्मठेपेची शिक्षा भोगते आहेस पण बघूया या मधून तू कस काय सुटतेस'.