'मी त्यांना डायरेक्ट प्रपोज केलं...', Prajakta Mali चा लव्ह लाईफविषयी खुलासा

Prajakta Mali Love Life : प्राजक्ता माळीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लव्ह लाइफविषयी खुलासा केला आहे. खरंतर तिनं कोणासा तरी प्रपोज केलं होतं याविषयी प्राजक्तानं सांगितलं आहे. प्राजक्ता ही लोकप्रिय असून तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

Updated: Apr 22, 2023, 12:36 PM IST
'मी त्यांना डायरेक्ट प्रपोज केलं...', Prajakta Mali चा लव्ह लाईफविषयी खुलासा title=
(Photo Credit : Prajakta Mali Instagram)

Prajakta Mali Love Life : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. प्राजक्ता तिच्या मोकळेपणानं बोलण्यासाठी ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्ट तर नेहमीत चर्चेत असतात. अनेक वेळा तर तिला सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे ट्रोलही करण्यात येत. इतकंच काय तर बऱ्याचवेळा प्राजक्ता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत येते. आता प्राजक्तानं एका मुलाखतीत तिच्या लव्ह लाईफ विषयी खुलासा केला आहे. 

प्राजक्ता माळीनं ‘लोकमत फिल्मी’ला ही मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्राजक्तानं तिच्या लव्ह लाइफ विषयी एक खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की ‘तू पहिल्यांदा कोणाला प्रपोज केलं होतं?’त्यावर प्राजक्ताने हसत हसत उत्तर दिले आहे. प्राजक्ता म्हणाली, 'मी नक्कीच प्रपोज केलं आहे. मलाच प्रपोज करावं लागलं, कारण माझ्या आजूबाजूला जी मुलं होती ती फारच साधी, सरळ होती. मी त्यांना डायरेक्ट प्रपोज केलं नव्हतं. तू बरा वाटतोस, चल मग बघू काही होतंय का, असं मी त्याला म्हटलं होतं '.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्राजक्ता माळी याच मुलाखतीत म्हणाली होती की तिला सलमान खानशी लग्न करायचं आहे. खरंतर तिच्या चुलत भावानं तिला हे बोलायला शिकवलं होतं. त्याविषयी बोलताना प्राजक्ता म्हणाली होती की 'मला सलमान खान आवडायचा. मी अगदीच लहान होते…म्हणजेच दोन-तीन वर्षांची असेन. माझ्या आतेभावाचा तो आवडता हिरो होता. त्याने मला शिकवलं होतं आणि मी म्हणायचे की मला सलमान खानशी लग्न करायचं.' हा किस्सा सांगितल्यानंतर प्राजक्ताही हसू लागली होती. 

हेही वाचा : तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे.... प्रभू श्री राम यांचे नाव घेत Adipurush Motion Poster प्रदर्शित

प्राजक्ता ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. प्राजक्तानं काही दिवसांपूर्वी तिच्या एका फोटो शूटचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राजक्ताला अनेकांनी तिच्या पोझमुळे ट्रोल केलं आहे. तर आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं प्राजक्ता प्राजक्ता राज या तिच्या ब्रॅंडचा लग्नसराई संच घेऊन आली आहे. त्याविषयी सांगत प्राजक्तानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत 'प्राजक्तानं अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खास तुमच्यासाठी घेऊन आलोय “लग्नसराई संच”.स्वतः वापरा, इतरांनाही भेट म्हणून द्या. असं कॅप्शन तिनं दिलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी हे अप्रतिम असल्याचं म्हटलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी आम्ही नक्कीच घेणार असं म्हटलं आहे.