'साहो' या चित्रपटात प्रभास बरोबर दिसू शकते श्रद्धा कपूर

अभिनेता प्रभास यांच्या नविन चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. बाहुबली या चित्रपटातूनच आंतरराष्ट्रीय अभिनेता प्रभास हा आता साहो या चित्रपटात दिसणार आहे. यात प्रभास बरोबर अनुष्का काम करणार होती. पण कुठल्यातरी कारणाने ती आता या प्रोजेक्टचा हिस्सा नाही. यासाठी खूप अभिनेत्रीच्या नावे चर्चा केली. साहो या चित्रपटात अभिनेता प्रभासबरोबर कुठली अभिनेत्री असेल हे अजूनही ठरलं नाही.

Updated: Aug 2, 2017, 05:38 PM IST
'साहो' या चित्रपटात प्रभास बरोबर दिसू शकते श्रद्धा कपूर title=

मुंबई : अभिनेता प्रभास यांच्या नविन चित्रपटाची चर्चा सध्या चालू आहे. बाहुबली या चित्रपटातूनच आंतरराष्ट्रीय अभिनेता प्रभास हा आता साहो या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात प्रभास बरोबर अनुष्का काम करणार होती. पण काही कारणाने ती आता या प्रोजेक्टचा भाग नसणार आहे. यासाठी खूप अभिनेत्रींची नावे चर्चेत होती. साहो या चित्रपटात अभिनेता प्रभासबरोबर कुठली अभिनेत्री असेल हे अजूनही ठरलं नाही.

अभिनेत्री श्रध्दा कपूरने म्हटले, बाहुबली या चित्रपटातली प्रभासची भूमिका मला खूप आवडली. मला जर प्रभास बरोबर काम करण्याची एक संधी मिळाली तर मी ते करेन, आणि मला त्यांच्या बरोबर काम करायला नक्की आवडेल. म्हणूनच बॉलिवूड अभिनेत्री श्रध्दा कपूरचं नाव चर्चेत आहे. साहो या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत यांनी हा चित्रपट तेलुगु, हिंदी, तामिळ आणि मल्याळममध्ये रिलीज करण्यात येईल असे म्हटले आहे