'आमचं पोरगं १२ तप पूर्ण करून...' पुतणी १२ वी पास झाल्यावर संतोष जुवेकरची पोस्ट

 संतोषने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  चित्रपटासह मालिका, वेब सीरिज या माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे. 

Updated: May 21, 2024, 06:20 PM IST
'आमचं पोरगं १२ तप पूर्ण करून...' पुतणी १२ वी पास झाल्यावर संतोष जुवेकरची पोस्ट title=

मुंबई : आपल्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात पोहोचलेल्या संतोष जुवेकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. संतोषने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  चित्रपटासह मालिका, वेब सीरिज या माध्यमांमध्ये त्याने काम केलं आहे. संतोषचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी संतोष कायमच सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. नुकतंच संतोषने एक अशी पोस्ट शेअर केली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच १२ वीचा रिझल्ट लागला. अभिनेत्याची पुतणी १२वी पास झाली आहे. यासंदर्भात संतोष जुवेकरने खास पोस्ट केली आहे.

अभिनेत्याची पोस्ट
शेअर केलेल्या पोस्टमध्ये संतोषने पुतणीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबतच संतोषने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,  ''आमचं पोरगं १२ तप पूर्ण करून आमच्यासाठी द्रोणागिरी पर्वत घेऊन आलंय. आमचं पोरगं पास झालं… नुसतं पास नाही अख्ख्या जुवेकर कुटुंबाचे पूर्वी पासून हरवलेले गुण आणि टक्के एकत्र एकटं घेऊन आलंय. म्हणून तर कुणा एका चित्रपटात बोलून ठेवलंय “म्हारी छोरियां छोरों से कम हैं के” आमची धाकड मुलगी… पिल्लू आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे…खूप खूप अभिनंदन तुला पिल्ल्या…खूप मोठा हो पिल्ल्या हा काका तुझ्याबरोबर आहे…गाणं तुझ्या आवडीचं लावलं हं!” संतोषची ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट
अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत अभिनेत्याच्या पुतणीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं की, संतोष जुवेकरची पुतणी म्हणून सगळे घाबरत असतील ना? या पोस्टवर संतोषने रिप्लाय करत म्हटलंय, निखळ प्रेम आणि एक मुलगी म्हणून आदर करावा तिचाच नाही तर सर्व मुलींचा.... आणि शिकावं तर तिच्या कष्टान कडे आणि तिच्या ध्येयायला बघून. बाकी घाबराव लागलं तर फक्त मला कारण मी तिचा हनुमान तिच्या सोबत आहे कायम. तुही रहा तुझ्या घरच्या मुली सोबत हनुमान बनून. मग सगळेच आदर करतील आपल्या सगळ्या मुलींचा. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, एक नंबर माझा दादा सुद्धा असाच पाठीशी असतो कायमच माझ्या थँक्स दादा हनुमानाची उपमा दिल्या बद्दल  खरंच दादा लोक असतात हनुमाना प्रमाणे कायम. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स युजर्स या पोस्टवर करत आहेत.