'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय

नेहमीच नव्या भुमिका स्विकारून प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाची मेजवानी देणारा सुबोध भावेला छत्रपतींच्या भुमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत आतूर झाले आहेत. 

Updated: Oct 5, 2022, 02:29 PM IST
 'हर हर महादेव' चित्रपटातील भुमिकेबद्दल अभिनेता सुबोध भावेचा मोठा निर्णय  title=

Subhodh Bhave: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे लवकरच 'हर हर महादेव' या भव्य दिव्य चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या भुमिकेतून रूपेरी पडद्यावर दिसणार आहे. हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटील येतो आहे त्यामुळे सर्वजण या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'हर हर महादेव' (Har Har Mahadev Pan India Release) हा चित्रपट पाच प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होत असलेला पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटातील भुमिकेविषयी सुबोध भावेनं एक मोठं वक्तव्य केलं आहे ज्याची सध्या जोरात चर्चा आहे. (popular marathi actor subhodh bhave says he will not take payment for the role in upcoming marathi movie har har mahadev)

नेहमीच नव्या भुमिका स्विकारून प्रेक्षकांना निखळ मनोरंजनाची मेजवानी देणाऱ्या सुबोध भावेला छत्रपतींच्या भुमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते अत्यंत आतूर झाले आहेत. या चित्रपटाचा पहिला लुक समोर आल्यानंतर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षावही केला.  

नुकतंच हर हर महादेव (Har Har Mahadev) या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा पार पडला. त्या दरम्यान झालेल्या मुलाखतीत सुबोधनं आपल्या भुमिकेबद्दल खुलासा केला आहे. सुबोधनं सांगितलं की या भव्यदिव्य चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी आपण कोणतंच मानधन घेतलेलं नाही तर त्या मानधनाचा उपयोग योग्य त्या कारणासाठी करायचं त्यानं ठरवलं. यामागचं कारणंही सुबोध भावेनं स्पष्ट केलं आहे.  

तो म्हणाला की, "कुठल्याही देवाची इच्छा असल्याशिवाय आपल्याला त्याचं दर्शन होत नाही तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असल्याशिवाय त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य कुणाला लाभत नाही. छत्रपतींची भूमिका तुमच्यापर्यंत येणं व तुम्हाला ती भुमिका साकारायला मिळणं हेच तुमच्यासाठी खूप मोठं मानधन आहे तेव्हा यापेक्षा अजून दुसऱ्या मानधनाची अपेक्षा करत नाही'', अशी भावना सुबोधनं व्यक्त केली. 

पुढे तो म्हणाला, ''जेव्हा मला या भूमिकेच्या मानधनाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा मी म्हटलं की हे मानधन मला शिवरायांच्या भूमिकेसाठी मिळतंय पण त्यावर माझा अधिकार नाही. हे छत्रपती शिवरायांचे पैसे आहेत म्हणजेच स्वराज्याचे पैसे आहेत. मला मिळालेल्या पैशांची मी एक FD केली आहे. त्यावर मिळालेलं व्याज मी शिवरायांनी ज्या उपेक्षित घटकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यांच्यासाठी पैशांच्या रूपात वापरणार आहे.''

सुबोधच्या या वक्तव्य उपस्थितांची मनं जिकंली. सध्या सुबोध भावे 'बस बाई बस' (Bas Bai Bas) या रिएलिटी शोचं सुत्रसंचालन करतो आहे. हा कार्यक्रमही लोकांच्या पसंतीस उतरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बालगंधर्व (Balgandharva), लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) आणि डॉ. काशिनाथ घाणेकर (Dr. Kashinath Ghanekar) यांच्या भुमिका सुबोध भावेनं अप्रतिमरित्या पेलल्या आहेत तेव्हा आता पुन्हा एक आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सुबोध भावे सज्जआहे यात काहीच वाद नाही. या आपल्या भुमिकेविषयी स्वतः सुबोध भावेही उत्सुक आहे.