'माझं general Knowledge कमी असेल पण...' अखेर आलियानं केला ट्रोलिंगवर खुलासा, पाहा Video

महेश भट्ट आणि आलिया भट्टचा असाच एक व्हिडीओही प्रसिद्ध झाला होता ज्यात महेश भट्ट आपल्या मुलीची खिल्ली उडवताना दिसले.

Updated: Oct 5, 2022, 02:30 PM IST
 'माझं general Knowledge कमी असेल पण...' अखेर आलियानं केला ट्रोलिंगवर खुलासा, पाहा Video title=

Alia Bhatt on Her GK Trolling: अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या सामान्य ज्ञानावरून म्हणजे जनरल नॉलेजवरून कित्येकदा ट्रोल झाली आहे (Alia Bhatt on Trolling). अनेक मुलाखतींमधून, इव्हेंट्समधून आलिया भट्टला जनरल नॉलेजवरचे प्रश्न विचारून लोकांनी हैराण करून सोडलं होतं. त्याला जनरल नॉलेजवरून तिच्या घरच्यांनीही तिची खिल्ली उडवली होती. (alia bhatt speak up on trolling about her general knowlege while receciving an award)

महेश भट्ट आणि आलिया भट्टचा असाच एक व्हिडीओही प्रसिद्ध झाला होता ज्यात महेश भट्ट आपल्या मुलीची खिल्ली उडवताना दिसले (Mahesh Bhatt on Alia Bhatt). आपल्या ट्रोलिगंचा आलिया भट्टनं आपल्या प्रसिद्धीसाठी पुरेपूर वापर करून घेतला आणि ही सल आलियाला आत्ताही चुकलेली नाही. 

अभिनेत्री आलिया भट्टला रविवारी सिंगापूरमध्ये टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्काराने (Alia Bhatt Award) सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्विकारताना तिनं एक प्रभावी भाषणही दिलं आहे ज्यामध्ये तिनं आपल्या उणिवाबद्दल आणि खासकरून आपल्याला आपल्या जनरल नॉलेजवरून ट्रोल करण्याबाबत अखेर खुलासा केला आहे आणि आपलं मतं माडलं आहे. 

तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आलियाने आपल्या भाषणात सांगितले की, मला वाटते की 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मी विचार करायचे की एक दिवस मी जगप्रसिद्ध कशी होईन. मी कोण आहे आणि मी किती मेहनती, प्रतिभावान आणि हुशार, तेजस्वी आणि परिपूर्ण आहे हे कोणीही ओळखू शकेल की नाही. मला परिपूर्ण व्हायचे होते आणि जगालाही हे कळावे अशी माझी इच्छा होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया पुढे म्हणाली की, आज मला माझ्यातील गुण आणि दोष साजरे करायचे आहेत. माझं जनरल नॉलेज कमी असेल किंवा मला स्पेलिंग्सही नीट येत नसतील परंतु मला माहिती आहे की मी माझ्याजागी योग्य आहे. मला भूगोलातलं काही कळत नाही, मी एकदम शून्य आहे. मला दिशांचीही कल्पना नाही. मी किती कमकुवत आहे, हे सर्व जगाला माझ्या सामान्य ज्ञानाबद्दल माहिती आहे. पण माझी भावनिक बुद्धिमत्ता कमी नाही आण तिचं मिळवण्यासाठी मी आत्तापर्यंत खूपच मेहनत घेतली आहे. 

आपल्या या भाषणानं आलियानं सर्वांनाच मंत्रमुग्ध करून सोडलं आहे.