काय? 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला स्टेडियममध्ये न्यूड होवून जायचंय?

कोण आहे 'ती' अभिनेत्री, जिने स्टेडियममध्ये न्यूड जाण्याची इच्छा केली व्यक्त, कारण...  

Updated: Feb 24, 2022, 02:01 PM IST
काय? 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला स्टेडियममध्ये न्यूड होवून जायचंय? title=

मुंबई : अभिनेत्री प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करतात. तर काही वादग्रस्त वक्तव्य करत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अशा अभिनेत्रींपैकी एक म्हणजे पूनम पांडे. पूनमने 2011 साली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या विजयानंतर कपडे उतरविण्याचा संकल्प केला होता. तो पूनम पांडेला पाळता आला नसला तरी तिने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयानंतर न्यूड होऊन हा विजय साजरा केला.

अखेर 11 वर्षांनंतर पूनमने वादग्रस्त वक्तव्यांचा खुलासा केला आहे. पूनम पुन्हा त्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. पूनम लवकरचं अभिनेत्री कंगना रानौतच्या  'लॉकअप' शोमध्ये दिसणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Poonam Pandey (@queenpoonampandey)

'लॉकअप' शोमध्ये असे सेलिब्रिटी आहेत, जे फक्त  वादग्रस्त मुद्द्यांमुळे चर्चेत आले. पूनम पांडे आणि वादग्रस्त मुद्द्यांचं नातं जुनं असल्यामुळे ती कंगनाच्या शोच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा  करताना दिसणार आहे. 

एका मुलाखतीत तिने महत्त्वाचा खुलासा केला, ती म्हणाली, 'मी फक्त प्रसिद्ध होण्यासाठी वदग्रस्त वक्तव्य केलं. 2011 साली माझी ओळख नव्हती. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमधील नसाल आणि तुम्हाला अभिनयात करियर करायचं असेल तर बोल्ड गोष्टी कराव्या लागतात..'

पूनम पुढे म्हणाली, 'जेव्हा मी ते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, तेव्हा मी फक्त आणि फक्त 18 वर्षांची होती. मी जे काही केलं ते प्रसिद्धीसाठी केलं.' आता 'लॉकअप'मध्ये पूनम कोणत्या गोष्टीचा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.