'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी

चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे. 

Updated: Mar 30, 2018, 04:45 PM IST
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे. 

राणेंनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. राणेंच्या भूमिकेत कुशल बद्रिके तर उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आहे. 

कार्यक्रमात आले गेस्ट कुठला सिनेमा ठरणार बेस्ट या कार्यक्रमात राजकारणी मंडळींची धमाल अनुभवता येणार आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी हे भाग प्रसारित केले जातील.