उर्फी जावेद पोलिसांच्या ताब्यात? हाताला धरून तिला नेलं आणि...

Urfi Javed Arrest : उर्फी जावेदला पोलिसांकडून अटक! व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केली चिंता व्यक्त...

दिक्षा पाटील | Updated: Nov 3, 2023, 10:28 AM IST
उर्फी जावेद पोलिसांच्या ताब्यात? हाताला धरून तिला नेलं आणि... title=
(Photo Credit : Viral Bhayani)

Urfi Javed Arrest : सोशल मीडियावर हटके कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी जावेदच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरतर, सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत उर्फीला पोलिसांनी अटक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी मोठा धक्का बसला असून तिला का अटक करण्यात आली असून त्याचं कारण देखील आश्चर्य कारक आहे. चला तर पाहुया काय झालय नक्की.

उर्फीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत काही पोलीस येतात आणि ते उर्फीला त्यांच्यासोबत पोलिस स्टेशनला घेऊन जाणार असल्याचे म्हणत आहेत. पोलिसांना पाहून उर्फी त्यांना विचारते की ते हे सगळं का करत आहेत. तेव्हा त्या दोन महिला पोलिसांच्या वेषात आल्या आणि बोलतात की ती तोकडे कपडे परिधान करते आणि याच कारणामुळे तिला पोलिस स्टेशनला जावं लागणार आहे. तर उर्फी त्यानंतरही सतत पोलिस स्टेशनला जाण्यास नकार देते. पण त्या दोघी पोलीस वेषात असलेल्या महिला ऐकत नाही आणि उर्फीला गाडीत बसवून घेऊन जातात. त्यावेळी उर्फी बोलते की हे काय आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून तिचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हे सगळं खोटं असल्याचं म्हटलं आहे. 

पाहा व्हिडीओ - 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : जेव्हा शाहरुखनं गौरीसमोर ठेवली बुरखा, नमाजची अट! पाहा, लग्नाच्या वेळी नेमकं काय घडलं?

खरंतर या व्हिडीओ मागील सत्य काय आहे हे अजून समोर आलेलं नाही, पण उर्फी जावेदला पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य झाले आहे. अनेक लोक कमेंट करून विचारत आहेत की 'हे सत्य आहे की कोणता प्रॅंक आहे. अनेकांनी याला प्रॅंक म्हटलं आहे.' तर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'ओव्हरअॅक्टिंग केल्यानं याचे 50 रुपये काप'. दुसरा नेटकरी म्हणाला 'कमी कपडे घालणाऱ्यांना तुरुंगात जावं लागतं आणि जे अब्रु लुटतात ते तुरुंगाच्या बाहेर असतात.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'खरे पोलिस कमी आणि रोहित शेट्टीचे पोलिस जास्त दिसतायत ते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'बॉलिवूडमध्ये तर सगळेच असे कपडे परिधान करतात.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भाऊ फेक आहे हे, त्या पोलिसांच्या बोलण्याच्या पद्धतीनं कळतय ते.'