पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील 'उरी'ची जादू

How's the Josh म्हणतं जिंकली कलाकारांची मने.

Updated: Jan 20, 2019, 12:08 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील 'उरी'ची जादू  title=

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मुंबईत भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन केले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. त्यांनी यावेळी सांगितलं की, सिनेमा आणि समाज हे एकमेकांचा प्रतिबिंब आहेत. सिनेमाप्रमाणे भारत देखील आता कात टाकत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेत असलेल्या 'उरी' सिनेमाचा एक डायलॉग बोलून सगळ्यांची मन जिंकली. 

 

भारतीय चित्रपटाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींशी  'उरी' स्टाईल संवाद साधला.  यावेळी त्यांनी 'हाऊ इज द जोश?' हा संवाद म्हणत मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला. नवा भारत घडवण्यासाठी देशातल्या प्रत्येक व्यक्तीत नवा जोश आहे. या जोशची देशाला गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या 'हाऊ इज द जोश' या वाक्याला उपस्थितांनी दाद दिली.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की,'गेल्या दोन दशकांपासून सिनेमा संग्रहालयाबद्दल चर्चा सुरू होती. अखेर आज अखेर त्याचं लोकार्पण झालं आहे. सिनेमातील सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मिळाली आहे. या राष्ट्रीय संग्रहालयात मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या गोष्टींचा इतिहास उलगडला जाणार आहे. यामधून आपल्या पुढील युवा पिढीला माहिती आणि प्रेरणा मिळणार आहे. '