असा असेल 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिरचा लूक!

बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आमिर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Updated: Sep 18, 2017, 09:53 AM IST
असा असेल 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' मधील आमिरचा लूक! title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या त्याच्या आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. आमिर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

त्यामुळेच या सिनेमाची प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. या सिनेमात आमिरचा वेगळा लूक बघायला मिळणार आहे. तो बघण्यासाठीही त्याचे चाहते आतुर आहेत. 

अशात या सिनेमात आमिरचा लूक कसा असेल, याचा खुलासा झाला आहे. नुकताच आमिर खान याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या फोटोतील त्याचा लूक हा या सिनेमातील लूक असल्याचे सांगितले जात आहे. आमिरचा हा फोटो पाहून लक्षात येतंय की, फायटींग सीननंतर तो कुठेतरी जात आहे. 

 

Take a look #aamirKhan in all different avatar shooting for #ThugsOfHindostan in a Mumbai Studio.

A post shared by Beingbollywood (@beingbollywood) on

आमिर त्याच्या प्रत्येक सिनेमातील लूकसाठी ओळखला जातो. तो भूमिका परफेक्ट करण्यासाठी लूकवर मेहनत घेतो. त्यामुळे या सिनेमातील त्याचा लूक कसा असेल याचे अंदाज लावले जात आहेत. अशातच हा फोटो व्हायरल झालाय आणि हाच त्याच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील लूक असल्याचे बोलले जात आहे. 

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमात आमिर आणि आमिताभ बच्चन यांच्यासोबतच कतरिना कैफ आणि फातिमा शेख यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.