VIDEO : वाढदिवसाच्या निमित्ताने रजनीकांत यांचा हटके अंदाज

खास वाढदिवसाच्याच निमित्ताने हा लूक सर्वांच्या भेटीला आला आहे.   

Updated: Dec 12, 2018, 01:10 PM IST
VIDEO :  वाढदिवसाच्या निमित्ताने रजनीकांत यांचा हटके अंदाज  title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी परवणीच. या खास दिवसाच्या निमित्ताने सर्वच स्तरांतून थलैवाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. चाहत्यांचं मिळणारं हे प्रेम पाहता खुद्द रजनीकांत यांनी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत अनोख्या अंदाजात त्याची परतफेडही केली आहे. 

'पेटा' या त्यांच्या आगामी तामिळ चित्रपटाचा टीझर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचा लूक अतिशय लक्षवेधी असून पुन्हा एकदा थलैवा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडत आहे. 

दाक्षिणात्य अंदाज, संगीत आणि एकंदरच 'रजनी'ची अनोखी झलक पाहणं, यातच चाहत्यांनी समाधान मानलं असून, आता उत्सुकता लागून राहिली आहे ते म्हणजे या चित्रपटाच्या ट्रेलरची. 

'२.०' या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर 'पेटा'ला प्रेक्षकांची पसंती मिळते का, हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. विजय सेतूपती, नवाजुद्दीन सिद्दीकी, सिमरन, त्रिशा, मालविका मोहन, मेघा आकाश आणि बॉबी सिंम्हा हे कलाकार या चित्रपटातून झळकणार आहेत. हा चित्रपट आणखी एका कारणामुळ खास आहे. ते कारण म्हणजे अष्टपैलू अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या निमित्ताने कॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. 

पोंगल या सणाचं औचित्य साधन निर्माते आणि दिग्दर्शकांन पेटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित केली आहे. या दिवशी तामिळ चित्रपटसृष्टीतील दोन मोठे कलाकार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यातील एक नाव म्हणजे अजित आणि दुसरं म्हणजे थलैवा रजनाकांत. अजित 'विश्वासम' या चित्रपटातून तर, रजनीकांत हे 'पेटा'मधून बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देणार आहेत.