चाहत्याची अजब मागणी पूर्ण करत दीपिकानं काय केलं पाहा Video

तिथं जे काही घडलं त्या प्रसंगाचा व्हिडीओ खुद्द दीपिकानंच सोशल मीडियावर शेअर केला 

Updated: Sep 30, 2021, 02:58 PM IST
चाहत्याची अजब मागणी पूर्ण करत दीपिकानं काय केलं पाहा Video  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किंवा टेलिव्हिजन सेलिब्रिटी कायमच कुठे फेरफटका मारायला निघाले, की त्यांच्या भोवती चाहत्यांचा गराडा पाहायला मिळतो. सर्वसामान्यांप्रमाणे त्यांना स्वच्छंदपणे वावरण्याची संधी फार कमीच मिळते. पण, जेव्हा जेव्हा ही संधी मिळते तेव्हा मात्र ही सेलिब्रिटी मंडळी संधीचं सोनं करायचा चुकत नाहीत बरं. 

अशीच संधी मिळाली अभिनेत्री दीपिका सिंग हिला. या संधीचं सोनं करत दीपिकानं समुद्रकिनारा गाठला. त्याचवेळी तिथं जे काही घडलं त्या प्रसंगाचा व्हिडीओ खुद्द दीपिकानंच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

दीपिका समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारत असताना आणि त्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटत असताना एक व्यक्ती तिथं येतो आणि तिच्याकडे थेट फोन नंबरची मागणी करताना दिसतो. हे पाहून दीपिकां त्याला नंबर तर सांगते पण, चार आकडे सांगितल्यानंतर ती त्याची चांगलीच कानउघडणीही करताना दिसते. 

बरं, हा प्रसंग प्रत्यक्षात घडला नसल्यामुळं त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. कारण, दीपिकानं एका इन्स्टा रीलच्या निमित्तानं हा व्हिडीओ तयार केला आहे. तिच्या या व्हिडीओला अनेकांचीच पसंती मिळत आहे. तर त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत.