बघा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील कार्तिकचा पहिला लुक

कार्तिकचा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील पहिला लुक समोर आला आहे. कार्तिकन स्वत: त्याचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Updated: Feb 5, 2019, 04:06 PM IST
बघा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील कार्तिकचा पहिला लुक title=

मुंबई: 'सोनू के टीटू की स्वीटी' सीनेमातील अभिनयाने चाहत्यांना आकर्षीत करणारा अभिनेता कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आहे. नुकताच प्रदर्शीत झालेल्या 'लुका-छिपी' सिमेनाच्या ट्रेलर आणि गाण्यांमूळे त्याच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कार्तिकचा 'पति-पत्नी और वो' सिनेमातील पहिला लुक समोर आला आहे. कार्तिकन स्वत: त्याचा सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने  सिनेमातील त्याच्या नावाचा खुलासा केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने 'मिलिए लखनऊ के चिंटू त्यागी जी से'. असे लिहीले आहे. कार्तिकने या फोटोमध्ये साधा चौकटींचा शर्ट घातला आहे. त्याच्या या लुकला पाहून हा सिनेमा मध्यम वर्गीय कुटुंबावर आधारित आहे. त्याचप्रमाणे त्याने सिनेमात मिश्याही ठेवल्या आहेत. कार्तिक फोटोमध्ये खूप साधा हाताची घडी घालून उभा आहे.

 

सिनेमात अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि अभिनेत्री अनन्या पांडे मुख्यभूमिकेत झळकणार आहेत. सिनेमात कार्तिक, भूमि, अनन्या पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज करणार असुन निर्मिती भूषण कुमार, जूनो चोप्रा आणि अभय चोप्रा करणार आहेत. 1978 साली आलेल्या 'पति पत्नी और वो'चा हा सिनेमे रिमेक असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन बलदेव राज चोप्रा यांनी केले होते.