'पसूरी' फेम अली सेठीनं सलमान तूरसोबत केला गुपचूप विवाह? पोस्ट शेअर करत गायकानं केला खुलासा

Pasoori fame Pakistani singer Ali Sethi on Marriage : पसूरी फेम गायक अली सेठीनं गुपचूप विवाह केल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता अली सेठीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 12, 2023, 12:11 PM IST
'पसूरी' फेम अली सेठीनं सलमान तूरसोबत केला गुपचूप विवाह? पोस्ट शेअर करत गायकानं केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Pasoori fame Pakistani singer Ali Sethi on Marriage : 'पसूरी' या गाण्यानं फक्त पाकिस्तानात नाही तर भारतातही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा गायक अली सेठी आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशी माहिती समोर येत आहे की अली सेठीनं लोकप्रिय आर्टिस्ट सलमान तूरशी न्यूयॉर्कमध्ये गुपचूप लग्न केलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर अली सेठी विषयी आलेल्या या बातमीनंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अली सेठीच्या लग्नाच्या बातमीनंतर आता त्यानं पहिल्यांदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अली सेठी त्याच्या लग्नाच्या बातमीविषयी बोलताना दिसला आहे. 

अली सेठीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अली सेठी म्हणाला की माझं अजून लग्न झालेलं नाही. मला नाही माहिती ही अफवा कोणी पसरवली. पण आशा आहे की माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गाण्याच्या प्रमोशनसाठी फायदेकारक ठरतील. त्यासोबत त्यानं त्याच्या गाण्याची लिंक देखील दिली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अली अजीज सेठी हा फक्त एक गायक नाही तर सॉंग रायटर, कंपोझर आणि ऑथर देखील आहे. त्याच्या गाण्यांची क्रेझ ही पाकिस्तानसोबतच भारतात देखील तितकीच आहे. विकिपीडियानुसार, अली सेठी Queer आहे. तर तो अशा काही पाकिस्तानी कलाकारांपैकी एक आहे जो त्याची आयडेन्टिटी ही प्रेक्षकांसोबत शेअर करतो. त्याचं म्हणणे आहे की त्याच्या देशाचा होमोफोबिया खूप वाढत चालला आहे. त्यामुळे समलैंगिक असल्यानं याविषयी लोकांना जागरुक करण्याची त्याच्यावर थोडी जबाबदारी आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

pasoori fame Ali Sethi secretly married Salman Toor singer shares post

सलमान तूर विषयी बोलायते झाले तर तो मुळचा पाकिस्तानी असून आता अमेरिकेचा रहिवासी आहे. सलमान तूर एक अमेरिकन पेंटर आहे. तो न्यूयॉर्कमध्ये राहतो तिथेच काम देखील करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार. अली अजीज सेठी आणि सलमान तूर हे खूप चांगले मित्र आहेत. सलमान आणि अलीची पहिली भेट ही Aitchison कॉलेजच्या आर्ट क्लासमध्ये झाली होती.  पण त्या दोघांच्या लग्नाची अधिकृत बातमी समोर आलेली नाही. एकीकडे त्यांच्या लग्नाच्या बातमीनं त्यांचे काही चाहते आनंदी आहेत. तर काही नेटकरी अली सेठीला ट्रोल देखील करत आहेत. 

हेही वाचा : सनी देओलचा 'गदर 2' अक्षय कुमारच्या 'ओएमजी 2' वर पडला भारी, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई

2022 साली 'द न्यूयॉर्कर' या मॅग्झीनला दिलेल्या मुलाखतीत सलमान तूरनं त्याच्या सेक्शुअलीटीविषयी सांगितलं होतं. तो 15 वर्षांचा असताना त्यानं त्याच्या पालकांना तो समलैंगिक असल्याची गोष्ट समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी हे स्वीकरालं नाही. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x