Parineeti Chopra चे 'या' खासदारासोबतचे फोटो व्हायरल

Parineeti Chopra चा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. परिणीतीचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या. परिणीती लवकरच दिलजीत दोसांझसोबत ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय परिणीतीकडे आणखी काही प्रोजेक्ट्स देखील आहेत. 

Updated: Mar 24, 2023, 11:06 AM IST
Parineeti Chopra चे 'या' खासदारासोबतचे फोटो व्हायरल  title=

Parineeti Chopra With Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. परिणीती ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत परिणीती चाहत्यांच्या संपर्कात राहते. परिणीती सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. परिणीती आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे परिणीती आणि आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत दिसली होती. त्यामुळे ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा सवाल अनेकांना पडला आहे. 

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना काल मुंबईत स्पॉट करण्यात आले होते. परिणीती आणि राघव यांचा हा फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर इंडियन सेलिब्रिटी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत परिणीती आणि राघव हे दोघेही पापाराझीसाठी पोज देताना दिसत आहेत. परिणीती आणि राघव या दोघांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्या दोघांचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी परिणीती आणि राघव हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत असे म्हटले गेले. पण, आता मात्र ही चर्चाही हवेत विरली आहे. कारण परिणीती आणि राघव हे दोघंही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं स्पष्ट होत आहे. 

Parineeti Chopra With Raghav Chadha photo viral

दरम्यान, परिणीती आणि राघव या दोघांना यंदाच्या वर्षीच 'भारत यूके आउटस्टॅंडिंग अचीवर्स ऑनर्स' नं सन्मानीत करण्यात आलं होतं. परिणीती आणि राघव यांच्यासोबतच सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या CEO अदार पूनावाला आणि भारतीय महिला फुटबॉल टीमच्या गोलकीपर अदिती चौहानला देखील हा पुरस्कार मिळाला आहे. भारतात पहिल्यांदा कोणाला हा पुरस्कार मिळाला होता. हा सोहळा खरं तर भारतीय विद्यार्थ्यांचे यश लक्षात घेऊन त्यांचे यश साजरा करण्यासाठी करण्यात येतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पुरस्कार परिणीतीला आणि राघव यांना कसा मिळाला? तर 15 वर्षांपूर्वी परिणीतीनं ब्रिटनच्या मॅनचॅस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आहे. तर राघव यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. परिणीती आणि राघव हे दोघंही त्यांच्या बॅचचे टॉपर होते. 

हेही वाचा : Anushka Sharma नं गुढी पाडव्यानिमित्तानं दिली 'या' मराठमोळ्या पदार्थाला पसंती

परिणीतीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकर ‘चमकीला’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय परिणीती खिलाडी कुमार अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) ‘कॅप्सुल गिल’या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.