ना घर ना जमीन... परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर!

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीतिसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असताना तिच्या चाहत्यांनी राघव चड्ढा यांच्याविषयी अनेक गोष्ट सर्च केल्या आहेत. दरम्यान, राघव चड्ढा यांची एकूण संपत्तीचा आकडा ऐकूण कोणालाही धक्का बसेल. दुसरीकडे त्या दोघांचे एकामागे एक असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतोय. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 3, 2023, 02:39 PM IST
ना घर ना जमीन... परिणीतीसोबत नाव जोडलं जात असताना Raghav Chadha यांची एकूण संपत्ती समोर! title=
(Photo Credit : Social Media)

Parineeti Chopra - Raghav Chadha Total Net Woth :  सेलिब्रिटी म्हटलं की ते त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या करिअरसोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते आता कुठे आहेत? काय करत आहेत? ते कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहेत? किंवा त्यांचा ब्रेकअप झाला का? जर रिलेशनशिपमध्ये आहे तर ती व्यक्ती काय करते हे सगळं जाणून घेण्याची इच्छा असते. अशात गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) ही चर्चेत आहे. परिणीति ही आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. सगळ्यात आधी त्या दोघांना मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पॉट करण्यात आले होते. तर त्यानंतर त्यांच्या भेटी वाढू लागल्या आहेत. अशात परिणीतिच्या चाहत्यांना राघव यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. (Parineeti Chopra and Raghav Chadha Viral Video)

राघव आणि परिणीति यांची भेट कशी झाली

राघल आणि परिणीति हे दोघेही लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये एकत्र शिकायला होते. इतकंच काय तर बऱ्याच वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. काही महिन्यांपूर्वी ते दोघं पंजाबमध्ये भेटले होते. परिणीति तिथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती. त्यावेळी तिची आणि राघव यांची भेट झाली. त्यानंतर त्या दोघांच्या भेटी वाढू लागल्या होत्या असे म्हटले जाते. पण त्या दोघांनी मात्र, या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. (Raghav Chadha Net Worth)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिणीतिच्या चाहत्यांनी राघव यांच्याकडे किती संपत्ती आहे हे देखील सर्च केले. माई नेता डॉट इंफोवर असलेल्या माहितीनुसार, 37 लाख म्हणजेच 36,99,471 रुपये अशी त्यांची संपूर्ण संपत्ती आहे. दरम्यान, माहितीनुसार, राघव यांच्याकडे स्वत: चं घर आणि जमीन काहीही नाही. (Raghav Chadha Property)

हेही वाचा : Aryan Khan चा बहिणीप्रती आदर व्यक्त करण्याचा अंदाज पाहता सोशल मीडियावर होतंय कौतुक

राघव यांच्या कार कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्यांच्याकडे स्विफ्ट डिझायर कार आणि 90 ग्रॅमचे दागिने आहेत. याशिवाय राघव यांनी बॅंड, डिबेंचर्स आणि शेअर्समध्ये 6.35 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. राघव यांच्या बँक खात्यात एकूण 14.57 लाख रुपये आहेत. त्यांना क्लेम आणि व्याज म्हणून सुमारे नऊ लाख रुपये मिळाले आहेत. (Raghav Chadha Car)