'परदेसी परदेसी' गाण्यामुळे गाजली, पण बॉयफ्रेंडच्या एका चुकीमुळे उद्धवस्त

बॉलीवूड ही अशी इंडस्ट्री आहे जिथे अनेक कलाकारांना संधी मिळाली परंतु पुढे त्यांना हवा तसा स्कॉप मिळाला नाही.

Updated: Oct 12, 2022, 12:43 PM IST
'परदेसी परदेसी' गाण्यामुळे गाजली, पण बॉयफ्रेंडच्या एका चुकीमुळे उद्धवस्त title=

Actress Pratibha Sinha Life Story: आजकाल इंडस्ट्रीत कलाकरांच्या आयुष्यातील अनेक लपलेली गुपितं समोर येताना दिसत आहेत. कधी कधी कलाकार स्वतःहूनच याबाबत खुलासा करतात तर कधी कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडून याबद्दल खुलासा केला जातो. (Celebrity on their Personal Life) कलाकारांमध्ये हल्ली असं पाहायला मिळतं की आपल्या आयुष्यातील अनेक गुपितंही ते प्रेक्षकांसोबत शेअर करतात. परंतु काही कलाकार मात्र आपलं आयुष्य हे अत्यंत खाजगी ठेवतात. (pardesi paresi actress pratibha sinha is out of the bollywood now because of this reason)

बॉलीवूड ही अशी इंडस्ट्री आहे जिथे अनेक कलाकारांना संधी मिळाली परंतु पुढे त्यांना हवा तसा स्कॉप मिळाला नाही. अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री आहे जिनं पहिला हिट चित्रपट दिला परंतु प्रेम, लग्नानंतर मात्र ती पुन्हा बॉलीवूडमध्ये फारशी दिसली नाही आणि गेली 23 वर्षे ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून गायब राहिली आहे. (Actress who is out of bollywood)

आणखी वाचा - फक्त पॉकेटमनीसाठी सिनेमात करायचं होतं काम, पण मोठ्या अभिनेत्रींना देतेय टक्कर

इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हा (Actress Mala Sinha Daughter) यांची मुलगी प्रतिभा सिन्हा (Pratibha Sinha) हिच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असेल. स्टार किड्सचं (Bollywood Star Kids) इंडस्ट्रीत येणं ही गोष्ट काही नवीन नसली तरी सुमारे डझनभर चित्रपटांमध्ये काम करूनही प्रतिभाला बॉलिवूडमध्ये विशेष ठसा उमटवता आला नाही. मात्र प्रतिभाच्या एका चित्रपटातील कामाचे नक्कीच कौतुक झाले आणि हा चित्रपट होता 'राजा हिंदुस्तानी' (Raja Hindustani). या चित्रपटात प्रतिभा आणि आमिर खानवर चित्रित केलेले 'परदेसी-परदेसी' (Pardesi Pardesi) हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. हे गाणं प्रचंड गाजले होते. 

एकेकीळा जूही, माधूरी दीक्षित (Madhuri Dixit), दिव्या भारती (Divya Bharti) यांसारख्या ग्लॅमरस अभिनेत्रींना टफ फाईट देणारी ही अभिनेत्री मात्र फार कमी कालावधीकरिताच बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली. त्यामुळे अचानक गायब झालेल्या प्रतिभाच्या आयुष्यात असे नक्की काय घडले ज्यामुळे ती बॉलिवूडमधून गायब झाली?

आणखी वाचा - करीना, विद्या बालनसोबत जुळलं नाव, पण अभिनेत्याने अरेंज मॅरेज करत सगळ्यांनाच दिला धक्का

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रतिभा एका प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक नदीमसोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये होती त्यामुळेच प्रतिभा आपल्या करिअरकडे फारसं लक्ष देऊ शकली नाही. प्रतिभाला अनेकांनी समजावयचा प्रयत्न केला परंतु ती मात्र त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. खुद्द प्रतिभाच्या आईनंही म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांनीही तिला समजवायचा खुप प्रयत्न केला परंतु आपल्या जन्मदात्या आईचंही तिनं ऐकलं नाही. 

यादरम्यानच अशी एक भयानक घटना घडली ज्यामुळे प्रतिभाचं करिअर मात्र संपुष्टात आलं. गुलशन कुमार यांच्या हत्येच्या आरोपांमध्ये नदीमचे नावं आलं होतं. दरम्यान नदीम देश सोडून ब्रिटनला गेला तेव्हा प्रतिभा इथे पूर्णपणे एकटी पडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार नदीमने प्रतिभासोबतचे संबंध तोडले होते आणि नदीमसोबतच्या संबंधामुळे प्रतिभाला चित्रपटात काम मिळणेही बंद झालं होतं. 

आणखी वाचा - आई नीतू कपूरनं Ranbir चा फोटो शेअर करतानाच नेटकरी म्हणाले...

आता प्रतिभा तिच्या आईसोबत मुंबईत राहते अशी बातमी समोर येते आहे.