लो नेक शिमर ब्लाऊज अन् लाल साडी.... 'या' अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा

ती तिच्या उंचीमुळे आणि आकर्षक फिगरमुळे चांगलीच लोकप्रिय आहे.

Updated: Jul 13, 2022, 05:13 PM IST
लो नेक शिमर ब्लाऊज अन् लाल साडी.... 'या' अभिनेत्रीच्या लुकवर चाहते फिदा  title=

मुंबईः सोशल मिडियावर आजकाल चांगलेच फोटो व्हायरल होतात त्यातून अभिनेत्रींच्या इन्टाग्राम पेजवरून त्यांचे हॉट आणि बोल्ड फोटोही चांगलेच व्हायरल होत असतात. यावेळी अशाच एका हॉट अभिनेत्रीचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. ती तिच्या उंचीमुळे आणि आकर्षक फिगरमुळे चांगलीच लोकप्रिय आहे. त्यातून तिची आईही बोल्डनेसच्या बाबतीत कमी नाही. बीग बॉसच्या मोठ्या पर्वात तिचे नाव चांगलेच गाजले होते. 

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी प्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी देखील सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही. बीग बॉस फेम श्वेता तिवारीची मुलगी भलतीच हॉट असून सध्या तिचे लाल साडीतले फोटोज भलतेच व्हायरल होत आहेत. पलक याबाबतीत तिच्या आईच्या दोन पावले पुढे आहे. अभिनेत्री पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे नवीन फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. यावेळीही असेच काहीसे घडले आहे तिने नुकतेच तिचे लाल साडीमधील हॉट व्हिडिओ व्हायरल केले आहेत. 

पलक तिवारीने लाल साडीत तिचे फोटोशूट केले आहे. तिने जॉर्जेट साडीसोबत चमकदार शिमर ब्लाउज घातला आहे. अभिनेत्रीच्या साडीचा लूक सुपर सिझलिंग आहे आणि त्यावर सगळेच फिदा झाले आहेत. पलकने लाल साडीवर बोल्ड, डार्क मेकअप केला आहे. न्यूड ग्लोइंग लिपस्टिक आणि आयशॅडोमध्ये पलक खूपच सुंदर दिसत आहे आणि मोकळे सोडलेले केस तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत. पलक तिवारीच्या ग्लॅमरस स्टाईलने चाहते नेहमीच प्रभावित होत आहेत. पलकने अत्यंत स्टाईलिश अशी ट्रान्सपरंट साडी नेसली आहे. 

बिजली-बिजली या गाण्याने पलकला प्रसिद्धी मिळाली. पलक सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांशी खास पोस्ट शेअर करून त्यांच्याशी जोडलेली असते. पलक तिवारीची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. वयाच्या विसाव्या वर्षीच श्वेता तिवारीला पलक ही मुलगी झाली. पलकही सध्या विशीच्या आसपास आहे तेव्हा त्या दोघीही एकत्र असताना आई-मुलीपेक्षा एकमेकांच्या बहीणीच वाटतात. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x