''तैमूर तू हे काय करतोयस..... '' तैंमूरला आत्तापासूनच का सुनावतेय करिना

सध्या तैमूरपेक्षा जेहची क्रेझ सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळते आहे. 

Updated: Jul 13, 2022, 04:33 PM IST
''तैमूर तू हे काय करतोयस..... '' तैंमूरला आत्तापासूनच का सुनावतेय करिना  title=

मुंबईः सध्या बॉलीवूड इंडस्ट्रीत हॉट कपल म्हणून नावाजलेले कपल म्हणजे करिना कपूर आणि सैफ अली खान. आतापर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांमधून एकत्र काम केले आहे. त्यांच्या लग्नालाही या वर्षी १० वर्षे पुर्ण होणार आहेत. लवककरच त्यांची वेडिंग अनिव्हर्सरी होईल. याशिवाय हे दोघेही कपल सुट्टीवर नाहीतर बाहेर भोजनासाठी सतत फिरताना दिसतात आणि दरवेळी स्पॉट होतात. त्यावेळी कुठेही बाहेर जाताना ते दोघं एकटे नसतात तर त्यांच्यासोबत जेह आणि तैमूरही असतात. सध्या तैमूरपेक्षा जेहची क्रेझ सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळते आहे. 

सध्या हे कपल विंनचेस्टरमध्ये असून तिथे सुरू असलेली इंडिया वेर्सेस इंग्लंड ओडी ही क्रिकेट मॅच पाहायला करिना, सैफ आणि तैमूर तिघंही तिथे गेले आहेत. त्यात तीन दिवसांपुर्वीच करिनाने सैफ अली खानचा, तैमूरचा आणि सैफच्या एका लंडन येथील मित्राचा एकत्रित फोटो इन्टावर टाकला होता. ज्यावर तिने "गॉडफादर, फादर अॅन्ड सन" असं कॅप्शनही दिलं आहे. त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की खान परिवार हा सध्या लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करतो आहे. नुकतीच करिना आपल्या बीएफएफसोबत म्हणजेच करिश्मा, अमृता सिंग आणि मलायका अरोरासोबत हटके लुकमध्ये दिसली होती. ज्यात त्या चौघींही फारच हॉट दिसत होत्या. 

सध्या लंडनमध्ये असलेले करिना, सैफ आणि तैमूर आज क्रिकेट मॅच इन्जॉय करत आहेत आणि त्याचसोबत तैमूरही क्रिकेट मॅच एन्जॉय करताना दिसतो आहे. इन्टाग्रामवरून करिनाने तिघांचे फोटो शेअर केले आहेत. त्यात करिना तैमूरच्या हालचालींंवरून त्याला सुनावत्येय, "टीम, व्हॉट आर यु डुईंग.." सर्वात म्हत्त्वाचे म्हणजे तैमूरची ही सर्वात पहिली मॅच आहे. त्याबद्दल चाहत्यांना सांगताना करिनाने इन्टा स्टोरी टाकली आहे. त्यातल्या दुसऱ्या फोटोमध्ये तैमूर विचित्र चेहरा करून सैफ अली खानच्या बाजूला बसलाय आणि त्यावर करिना त्याला सुनावते आहे. ही गंमत म्हणून करिनाने आपल्या इन्टा स्टोरीवर पोस्ट केली आहे तरी ही मॅच पाहताना मात्र तैमूर कंटाळालेला आहे असे वाटत आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा वेगळाच लुक करून तैमूर मॅच एन्जॉय करत आहे. 

करिना कपूर खान ही लवकरत तिच्या 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तेव्हा सध्या करिना भलतीच चर्चेत आहे.