Video : अभिनेत्री Palak Tiwari ची मुंबईत ऑटो राईड

पलक तिवारीच्या स्टाइलबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पलक खूप लोकप्रिय आहे 

Updated: Aug 23, 2022, 11:50 PM IST
Video : अभिनेत्री Palak Tiwari ची मुंबईत ऑटो राईड title=

मुंबई : पलक तिवारीच्या स्टाइलबद्दल तुम्हाला आधीच माहिती आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी पलक खूप लोकप्रिय आहे आणि सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. कधी डान्स व्हिडिओसाठी तर कधी स्टाइलसाठी पलक नेहमीच चर्चेत असते. त्याचबरोबर, आता या सुंदरतेने असे काम केले आहे की लोकांचा विश्वास बसत नाही. पलक तिवारीला अनेकदा मुंबईत स्पॉट केले जाते आणि यावेळी ती ऑटोमध्ये फिरायला गेली आणि स्टाईलमध्ये मागची सीट घेतली.

झोपून दिल्या जबरदस्त पोझ
पलक तिवारीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ऑटोच्या मागच्या सीटवर पोज देताना दिसत आहे. तर तिचे चाहते देखील तिची स्टाईल पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

त्याचबरोबर या फोटोवर लोकं खूप मजेशीर कमेंट करत आहेत. कोणी म्हणत आहे की आम्हाला ऑटो ड्रायव्हर व्हायचं आहे, तर कोणी पलकच्या हॉट स्टाइलवर कमेंट करत आहे, तर कोणी फायर ब्रिगेडला कॉल करा असं लिहित आहे.

पलक बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज 
तसं, पलक तिवारी बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे आणि तिने यासाठी तयारी केली आहे. यामुळेच तिने टीव्हीवरही काम केलं नाही. मात्र, हार्डी संधूने गायलेल्या बिजली या म्युझिक व्हिडिओमधून तिला अधिक ओळख मिळाली. या गाण्यानंतर पलक तिवारी अचानक प्रकाशझोतात आली आणि तेव्हापासून तिने तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना क्लीन बोल्ड करून केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 पलक ही श्वेता तिवारीची मुलगी आहे
पलक ही टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे. जी दोन दशकांपासून छोट्या पडद्यावर राज्य करत आहे. तिने हिट शो आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं असतानाच तिने भोजपुरी सिनेमातही खूप काम केलं आहे.