पलक तिवारीच्या बॉयफ्रेंडचं सुहाना खानसोबत आहे खास कनेक्शन

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचा बॉयफ्रेंड वेदांग रैना सध्या जोरदार चर्चेत आहे. 

Updated: Jun 27, 2022, 07:36 PM IST
पलक तिवारीच्या बॉयफ्रेंडचं सुहाना खानसोबत आहे खास कनेक्शन title=

मुंबई : श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचा बॉयफ्रेंड वेदांग रैना सध्या जोरदार चर्चेत आहे. पलक तिवारी वेदांगला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. याआधी पलक सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत असल्यामुळे चर्चेत होती. मात्र, नंतर तिने यावर स्पष्टीकरण देत म्हणाली, आम्ही दोघंही चांगले मित्र आहेत. यानंतर काही वेळातच पलक आणि वेदांगच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू झाली. मात्र याबाबत पलक किंवा वेदांग यांनी अद्याप काहीही वक्तव्य केलेलं नाही.

वेदांग रैना एक अभिनेता आणि गायक आहे. तो शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि जान्हवी कपूरची धाकटी बहीण खुशी कपूरसोबत झोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये पदार्पण करत आहे. द आर्चीजच्या पोस्टरवर वेदांग रैनाही दिसत आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

वेदांग रैनाचा जन्म मुंबईत झाला आणि त्याचं शिक्षण जमनाबाई येथे झाले आणि नंतर त्याने नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड स्टडीज (NMIMS) येथे शिक्षण घेतले. वेदांग 26 वर्षांचा असून अभिनयासोबतच त्याला गायनाचीही आवड आहे. त्याचं YouTube वर वेदांग रैना नावाचे एक चॅनल देखील आहे. ज्यावर त्याने अनेक गाणी शेअर केली आहेत. द वीकेंड्स अर्न इट आणि खालिद टॉक सारखी गाणी गायली आहेत.

आर्चीजचा पहिला ट्रेलर आल्यानंतर वेदांग खुशी कपूरसोबत उटी येथील एका रेस्टॉरंटमध्ये दिसला. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर तो खुशी आणि सुहानाचा चांगला मित्र आहे. वेदांग त्याच्या क्यूट लूकमुळे चाहत्यांना खूप आवडतो. त्याचबरोबर त्याच्या अभिनय कौशल्याचंही कौतुक होत आहे. ती एक मॉडेल देखील आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याचा द आर्चीज हा चित्रपट नेटफ्लिक्सवर २०२३ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. आर्चीजमध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर, मिहिर आहुजा, अदिती हे त्याचे सहकलाकार आहेत.