Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर?

Sonali Bendre ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनालीनं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोनालीनं फक्त बॉलिवूड नाही तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सोनालीनं आता तिच्या कर्करोगावर मात केली असून ती सुखरूप आहे. 

Updated: Mar 25, 2023, 04:57 PM IST
Sonali Bendre चा पाकिटात फोटो ते अपहरण करण्यापर्यंतचा मानस, कोण आहे 'हा' क्रिकेटर? title=

Shoaib Akhtar had Crush On Sonali Bendre : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आजही सोनालीच्या चाहत्यांची संख्याही कमी झालेली नाही. सोनालीचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. पाकिस्तानमध्ये तर तिचे लाखो चाहते आहेत. एकदा तर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर सोनाली बेंद्रे विषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. शोएबनं एका मुलाखतीत त्याला सोनालीवर क्रश असून तिच्याशी लग्न करायचे आहे म्हटले होते. तिनं नकार दिल्यास तिचे अपहरन करेन असे सांगितल्याचे म्हटले. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शोएबनं या सगळ्या अफवा असल्याचा खुलासा केला आहे. 

रिपोर्ट्सनुसार, शोएब अख्तरला सोनाली बेंद्रेवर क्रश होतं आणि एका टॉकशोमध्ये त्यानं म्हटलं होतं की सोनालीला प्रपोज करण्यासाठी तो काहीही करेल. जर तिनं नकार दिला तर तो तिचं अपहरण करेल. शोएब हा सोनालीचा चाहता आहे. इतकंच काय तर शोएब सोनालीवर प्रेम देखील करायचा. शोएब सोनालीचा एक फोटो त्याच्या पाकिटात ठेवायचा. शोएबच्या टीम मेट्सला देखील त्याच्या भावनांविषयी माहित होते. 

हेही वाचा : घशामध्ये गाठी, डॉक्टर म्हणाले 'तुझा कायमचा....', प्रसिद्ध Actress चा धक्कादायक खुलासा, चाहत्यांना विनंती

टाइम्स नाऊनं दिलेल्या वृत्तानुसार, शोएबनं याविषयी बोलत सांगितले की मी सोनालीला कधी भेटलो नाही, 'मी कधीच तिचा फॅन नव्हतो. मी एक-दोनवेळा तिचे चित्रपट पाहिले असतील, पण मी कधीच तिचा चाहता नव्हतो. मी तिला चित्रपटातच पाहिलं होतं आणि ती खूप सुंदर स्त्री आहे. ती आजारी असताना, तिचा संघर्ष मी पाहिला होता. तिनं हिंमत्त दाखवली आणि ब्रेव्ह महिलेप्रमाणे त्यातून बाहेर पडली.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे शोएब म्हणाला, 'तिनं स्वत: शी संघर्ष केला आणि त्यानंतर मी तिचा चाहता झालो. एका महिलेला इतकं ब्रेव्ह पाहून मला खूप चांगलं वाटलं होतं. तिनं दुसऱ्या महिलांना रस्ता दाखवला. मला ती आवडायची हे म्हणणं चुकीचं आहे. माझ्या रूममध्ये तिचं पोस्टर होतं हे बोलणं पण चुकीचं आहे. माझ्या रुममध्ये पोस्टर होता पण तो इमरान खानचा होता. ते एकमेव क्रिकेटर आहेत ज्यांना मी माझा आदर्श समजतो.' 

सोनालीच्या आजाराविषयी बोलायचे झाले तर...

2018 साली सोनालीला मेटास्टेटिक कर्करोगाचे निदान झाले. उपचारानंतर सोनाली आता ठीक आहे. सोनाली सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याविषयी सांगताना दिसते. सोनालीच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर तिनं गोल्डी बहल यांच्याशी लग्न केलं आहे आणि त्यांना एक मुलगा असून रणवीर असं त्याच नाव आहे.