पाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या

पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे.

Updated: Aug 9, 2018, 01:39 PM IST
पाकिस्तानी अभिनेत्री-गायिका रेशमाची गोळी झाडून हत्या title=

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री आणि गायिका रेशमाची हत्या झाली आहे. तिच्या नवऱ्यानेच गोळ्या झाडून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे समजतेय. रेशमा आणि तिचा पती फैदा खान यांच्यात खूप काळापासून वाद होत होते. त्यामुळे ती आपल्या आईवडिलांच्या घरी राहत होती.

घरगुती वादामुळे घरात शिरून रेशमाच्या नवऱ्याने तिच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर रेशमाच्या भावाने फैदा खानविरोधात तक्रार दाखल केली आहे. 

समजूत घालायला गेला होता पण...

फैदा खान परदेशात नोकरीला असून काही दिवसांपूर्वीच तो परतला होता. रेशमाची समजूत घालून तिला घरी परत आणण्यासाठी तो तिच्या माहेरी गेला. पण रेशमाने त्याच्यासोबत परत जाण्यास नकार दिला. यामुळे नाराज झालेल्या फैदाने रेशमावर गोळ्या झाडल्या आणि तेथून पळ काढला. रेशमा ही फैदा खानची चौथी पत्नी होती.