मुंबई : भारतात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती पाहात अनेक राष्ट्रा भारताला मदत करण्याच्या विचारत आहेत. या राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि चीनचा देखील समावेश आहे. सध्या ट्विटरवर #PakistanstandswithIndia असा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगचा वापर करत अनेक पाकिस्तानी युजर्सने भारताला पाठिंबा दिला आहे. एका पाकिस्तानी कलाकाराने देखील भारतासाठी प्रार्थना केली.
अभिनेता अली झफरने भारत आणि भारतीय नागरिकांसाठी प्रार्थना केली आहे. अलीने एक ट्विट केलं आहे. ट्विट करत तो म्हणाला, 'भारतासाठी प्रार्थना करतो. या संकट काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत..' सोबतचं अलीने #PakistanstandswithIndiaचा देखील वापर केला आहे.
Prayers for India. We are with you in these difficult times. #PakistanstandswithIndia
— Ali Zafar (@AliZafarsays) April 24, 2021
भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग (Cornavirus in India)झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, भारतातील कोरोना केसेसनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 3 लाख 54 हजार 531 लोकांना भारतात कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर या काळात 2 हजार 806 लोक मरण पावले.
यानंतर, भारतात कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 1 कोटी 73 लाख 4 हजार 308 वर गेली आहे. तर 1 लाख 95 हजार 116 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात 1 कोटी 42 लाख 96 हजार 640 लोक बरे झाले आहेत. देशभरात 28 लाख 7 हजार 333 लोकांवर उपचार सुरू आहेत, जे संक्रमित लोकांच्या एकूण संख्येच्या 16.2 टक्के आहेत.