मुंबई : 'पॅडमॅन' हा येऊ घातलेला चित्रपट तसा वेगळ्या धाटणीतला. अगदी विषय निवडीपासून त्याच्या आषयापर्यंत. येत्या २६ जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, तोपर्यंत त्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, चित्रपटाचा विषय पाहून हा चित्रपट करमुक्त करावा अशीही मागणी पुढे येत आहे. या मागणीवर अभिनेता अक्षय कुमारने महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे की, पॅडमॅन अजिबात करमुक्त व्हायला नको. एका बाजूला महिला सॅनिटरी नॅपकीन्स करमुक्त करण्याची मागणी करत आहेत. मात्र, माझे म्हणने असे की असे अजीबात व्हायला नको. आपल्या बजेटमधील जो पैसा संरक्षणावर खर्च होतो त्यापैकी पाच टक्के पैसा इकडे वर्ग करा. हवे तर, एक बॉम्ब कमी बनवा पण महिलांना नॅपकीन खरेदी करण्यासाठी पैसे द्या.
'पॅडमॅन' हा एक चरित्रात्मक चित्रपट आहे. अरूणाचललम मुरूगगनाथम यांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा आधारली आहे. या चित्रपटाचे प्रोमो, ट्रेलर्स, पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार याच्यासोबत राधिका आपटे आणि सोनम कपूरच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.