‘पॅडमॅन’ने किती केली आत्तापर्यंत कमाई?

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयच्या 'पॅडमॅन' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वीकेंडपर्यंत ४० कोटींची कमाई केलीये.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 12, 2018, 08:30 PM IST
‘पॅडमॅन’ने किती केली आत्तापर्यंत कमाई? title=

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयच्या 'पॅडमॅन' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर वीकेंडपर्यंत ४० कोटींची कमाई केलीये.

या सिनेमाने पहिल्या दिवशी १० कोटी, दुस-या दिवशी १३ कोटी तर तिस-या दिवशी १७ कोटींची कमाई केलीये. सिनेमाला समीक्षकांनीही पसंतीची पावती दिली असून हा सिनेमा १०० कोटी क्लबमध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला जातोयं.

भारतात जरी या सिनेमाने चांगली ओपनिंग मिळवली असली तरी पाकिस्तानमध्ये मात्र या सिनेमावर बंदी घालण्यात आलीये.